Prithvi Shaw : टीम इंडियानंतर मुंबई संघातून हकालपट्टी झालेल्या पृथ्वी शॉची कमाई किती? कुठून अन् कसा कमावतो पैसे? जाणून घ्या संपत्ती
पृथ्वी शॉला फिटनेस आणि शिस्तभंगाच्या कारणांमुळे पुढील रणजी सामन्यासाठी मुंबई संघातून वगळण्यात आले आहे.
Prithvi Shaw Net Worth : पृथ्वी शॉला फिटनेस आणि शिस्तभंगाच्या कारणांमुळे पुढील रणजी सामन्यासाठी मुंबई संघातून वगळण्यात आले आहे. आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार पटकावून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची धमाकेदार सुरुवात करणाऱ्या पृथ्वीने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. खराब फॉर्ममुळे त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले होते. यानंतर त्याने काउंटी क्रिकेटमध्ये जाऊन धावा केल्या. त्यानंतर 2023 मध्ये त्याला टी-20 संघात परतण्याची संधी मिळाली, परंतु प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचा समावेश करण्यात आला नाही. वयाच्या 24 व्या वर्षी पृथ्वी करोडोंचा मालक आहे. त्याला लक्झरी कारची खूप आवड आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावून रातोरात स्टार बनलेल्या उजव्या हाताचा फलंदाज पृथ्वी शॉची एकूण संपत्ती 25 कोटी रुपये आहे. शॉची सध्याची आयपीएल फी 8 कोटी रुपये आहे. दिल्ली कॅपिटल्सने 2024 मध्ये त्याला या रकमेसाठी साइन केले होते. याशिवाय तो जाहिरातींमधूनही भरपूर कमाई करतो. रिपोर्टनुसार, त्याचे मासिक उत्पन्न 40 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. त्याने आयपीएलमधून चांगली कमाई केली आहे. पृथ्वीकडे BMW 6 सीरीजसह इतर अनेक कार आहेत.
पृथ्वी शॉचे मुंबईत आलिशान घर आहे. या वर्षी एप्रिलमध्ये त्याने सोशल मीडियावर सांगितले होते की, त्याचे मोठे स्वप्न पूर्ण झाले. दोन वर्षांपूर्वी मुंबईतील वांद्रे भागात सी फेसिंग घर विकत घेतले होते. जे एप्रिल 2024 मध्ये तयार होईल. त्याने सोशल मीडियावर त्याच्या आलिशान घराचे अनेक फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये मोठ्या बाल्कनीपासून ते आलिशान लिव्हिंग रूमपर्यंत सर्व काही दिसत होते. या घराची किंमत 15 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
पृथ्वी शॉची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द
2018 मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉने 5 सामन्यात 339 धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. पृथ्वीची कसोटीतील फलंदाजीची सरासरी 42.37 आहे. डिसेंबर 2020 मध्ये त्याने शेवटची कसोटी खेळली. शॉच्या नावावर सहा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 189 धावा आहेत. शॉची वनडेत सरासरी 31.50 होती. तो एक टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे जिथे त्याचे खाते उघडले नाही. आयपीएलमध्ये एका षटकात सलग 6 चौकार मारण्याचा विक्रम करणाऱ्या पृथ्वीने 79 आयपीएल सामन्यांमध्ये 1892 धावा केल्या. या काळात त्याने 14 अर्धशतके झळकावली आहेत. त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या 99 धावा आहे.
हे ही वाचा -