Prithvi Shaw : श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठीही पृथ्वी शॉ संघात नाही, निराश फॅन्सचे सोशल मीडियावरील रिएक्शन व्हायरल
Prithvi Shaw in Team : पृथ्वी शॉ बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियात पुनरागमन करू शकलेला नाही. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत त्याला संधी देण्यात आली नाही.
Prithvi Shaw in Team India : भारताचा युवा, स्फोटक सलामीवीर पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) आपल्या दमदार कामगिरीने सर्वांची मनं जिंकली होती. त्याने अनेक महत्त्वाच्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. पण पृथ्वी सध्या भारतीय संघाबाहेर असून काही काळापासून खास फॉर्मात नसल्याने त्याला संघाबाहेर ठेवलं आहे. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने चांगली कामगिरी केल्यावर आता भारत आणि श्रीलंका यांच्यात नववर्षानिमित्त होणाऱ्या मालिकेसाठीही त्याचा संघात समावेश होईल असं वाटत होतं. पण त्याला टी20 आणि एकदिवसीय दोन्ही संघात स्थान न मिळाल्याने शॉ चे चाहते निराश झाले आहेत.
पृथ्वी शॉ जुलै 2021 पासून भारतीय संघाबाहेर आहे आणि जवळपास दीड वर्षानंतरही तो पुनरागमन करू शकलेला नाही. जुलै 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताकडून शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. त्याच वेळी, शेवटचा कसोटी सामना डिसेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने खेळला. पृथ्वीने भारतासाठी 6 वनडे आणि 5 कसोटी सामने खेळले आहेत. मात्र सध्याच्या कामगिरीने तो निवडकर्त्यांना प्रभावित करू शकलेला नाही. शॉवर अन्याय होत असल्याचं संघाचा फलंदाज पृथ्वीच्या चाहत्यांचं मत आहे. पृथ्वीबाबत चाहत्यांनी सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याला संघात न घेण्याचे कारणही बीसीसीआयला विचारले आहे.
When Prithvi Shaw was in red hot form in last two years he was ignored and when he failed in two Ranji matches Chetan Sharma has the natural excuse .All in all the fact of the matter is ,As long as chetu is chairman Prithvi will never be selected.This is the tweet . https://t.co/9vRbcRFjFb
— Swarn (@kotwal_swarn) December 28, 2022
Dear @BCCI what is your selection criteria to select the players? Where is @IamSanjuSamson and @PrithviShaw for ODI. The one opener is required like @virendersehwag who can fire from initially. We got him luckily as a opener after Sehwag sir retired. Shame on U @BCCI
— Dr. Viresh Kumar (@look4veeru) December 28, 2022
@PrithviShaw deserves a chance.@BCCI please don't spoil his career.
— Priyadarsi Palo (@Priyadarsi8) December 28, 2022
Ek chance to deserve karta hai @PrithviShaw #BCCI #INDvsSL pic.twitter.com/lWWK3TqABG
— Pintu Yadav (@pintuabd18) December 27, 2022
Feel for Prithvi Shaw. He is not selected once again in Team India's any squads against Sri Lanka series.
— CricketMAN2 (@ImTanujSingh) December 27, 2022
Shikhar Dhawan, Prithvi Shaw and Rishabh Pant after dropped from India vs Srilanka series#INDvsSL pic.twitter.com/8o6yf1axmY
— Jai Upadhyay (@jay_upadhyay14) December 27, 2022
शॉ संघात पुनरागमनासाठी घेतोय मेहनत
पृथ्वी शॉ एक स्फोटक सलामीवीर म्हणून टीम इंडियामध्ये आपली भूमिका चांगल्या प्रकारे निभावू शकतो. शॉ सलामीला येऊन झटपट धावा करण्यासाठी ओळखला जातो. केएल राहुलच्या जागी पृथ्वी शॉला संघात संधी दिली जाऊ शकते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो चांगली कामगिरी करत आहे. शॉ गेल्या काही दिवसांपासून त्याच्या फिटनेसवर देखील सतत काम करताना दिसत आहे. आयपीएल 2022 पासून त्याने 7-8 किलो वजन कमी केल्याचे समोर आले आहे.
हे देखील वाचा-