IND vs PAK: भारताविरोधात पाकिस्तानच्या 11 शिलेदारांची घोषणा, पाहा कुणाला मिळाली संधी?
India vs Pakistan, Pakistan Playing 11: भारताविरोधातील महामुकाबल्याच्या पूर्वसंध्येला पाकिस्तान संघाने आपली प्लेईंग ११ ची घोषणा केली आहे.
India vs Pakistan, Pakistan Playing 11: भारताविरोधातील महामुकाबल्याच्या पूर्वसंध्येला पाकिस्तान संघाने आपली प्लेईंग ११ ची घोषणा केली आहे. शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये हायहोल्टेज सामना होणार आहे. बाबर आझमच्या नेतृत्वातील ११ शिलेदारांची घोषणा पीसीबीने केली आहे. बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाने आशिया चषकाची सुरुवात दणक्यात केली आहे. पाकिस्तानने पहिल्याच सामन्यात नेपाळचा २३८ धावांचा पराभव केला. या विजयामुळे पाकिस्तानचा आत्मविश्वास वाढलेला असेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कँडी येथील पल्लेकेले स्टेडिअमवर शनिवारी दुपारी होणार आहे. तब्बल चार वर्षानंतर भारत आणि पाकिस्तान एकदिवसीय सामन्यात आमनेसामने असतील.
शाहिन आफ्रिदी तंदुरुस्त -
पाकिस्तानचा भेदक गोलंदाज शाहिन आफ्रिदी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. नेपाळविरोधात सामन्यात आफ्रिदीला दुखापत झाल्याच्या चर्चा होत्या. पण आज पाकिस्तानच्या चाहत्यांना दिलासादायक बातमी मिळाली आहे. शाहिन भारताविरोधात मैदानात उतरणार आहे. पाकिस्तानने नेपाळविरोधातील विजयी संघ भारताविरोधात मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केलेय.
भारताविरोधात पाकिस्तानचे ११ शिलेदार कोणते ?
फखर जमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, सलमान आगा, मोहम्मद नवाज, शादाब खान, हारिस रऊफ, नसीम शाह आणि शाहिन शाह आफ्रिदी.
Pakistan to field same playing XI tomorrow 🇵🇰#PAKvIND | #AsiaCup2023 pic.twitter.com/qe18Ad6pF4
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 1, 2023
भारताची संभाव्य प्लेईंग 11
ईशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा(कर्णधार), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
पावसाची शक्यता -
कँडीमध्ये शनिवारी पाऊस कोसळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पावसामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. हवमान विभागाच्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ५१ टक्के पावसाची शक्यता आहे. तर दुपारी ७० टक्के पाऊस कोसळू शकतो. संध्याकाळी पावसाचा अंदाज नाही. पावसामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची दाट शक्यता आहे
हेड टू हेट स्थिती काय ?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या हायहोल्टेज सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आतापर्यंत 132 एकदिवसीय सामने झाले आहेत. ज्यामध्ये भारताने 55 सामने जिंकले आहेत आणि पाकिस्तानने 73 सामने जिंकले आहेत.
हायव्होलटेज सामन्यात कोण बाजी मारणार ?
आशिया कप स्पर्धेतील टीम इंडियाचा हा पहिलाच सामना असेल. तर पाकिस्तानचा दुसरा सामना असेल. पाकिस्ताननं आपला पहिला सामना नेपाळविरुद्ध खेळला आहे. या सामन्यात पाकिस्ताननं धमाकेदार विजय मिळवला आहे. यापूर्वी 2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते, ज्यामध्ये टीम इंडियानं बाजी मारली होती. आणि 2 सप्टेंबरला आशिया कप स्पर्धेत खेळला जाणारा टीम इंडिया-पाकिस्तानचा हायव्होलटेज सामन्यात कोण बाजी मारणार ? याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय.