Pakistan Cricket Team Fined by ICC : कंगाल पाकिस्तान संघाला मोठा धक्का! कर्णधाराची 'ती' चूक अन् बाबर-रिजवानला लाखोंचे नुकसान, ICCने केली कारवाई
शान मसूदच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तान क्रिकेट संघाला क्लीन स्वीपचा सामना करावा लागला.
Pakistan Cricket Team Fined by ICC : शान मसूदच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तान क्रिकेट संघाला क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. या पराभवानंतर पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनमध्ये खेळला गेला. आयसीसीने स्लो ओव्हर रेटमुळे पाकिस्तान संघावर कारवाई केली आहे.
ICC ने पाकिस्तान संघावर केली कारवाई
न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंडवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट संघाचे 5 गुण कापले आहे आणि संघाला मॅच फीच्या 25 टक्के दंडही ठोठावला. म्हणजेच बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानला कर्णधार शान मसूदची स्लो ओव्हर रेटची चूक महागात पडली. ज्यामुळे आयसीसीने त्यांची मॅच फी कापली. आयसीसीने सांगितले की, एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनेल ऑफ मॅच रेफरीचे सदस्य रिची रिचर्डसन यांनी पेनल्टी आणि पॉइंट कपात केली. पाकिस्तान संघाने निर्धारित वेळेत 5 षटके कमी टाकली.
Pakistan have been fined, and docked World Test Championship points owing to slow-over rate during Cape Town Test.#SAvPAK #WTC25https://t.co/jxF35Nk086
— ICC (@ICC) January 7, 2025
स्लो ओव्हर रेटमुळे 25 टक्के दंड
केपटाऊनमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संथ ओव्हर-रेट राखल्याबद्दल पाकिस्तानला त्याच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. यासोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 5 पॉइंट्स कापण्यात आले आहेत, असे आयसीसीने मंगळवारी प्रसिद्धी माध्यमात म्हटले आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, निर्धारित वेळेत कमी षटके टाकल्यास संघांना प्रत्येक सामन्याच्या फीच्या पाच टक्के दंड भरावा लागतो.
JUST IN: Pakistan have been penalised five WTC points and fined 25% of their match fee for maintaining a slow over rate in the Cape Town Test against South Africa.
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) January 7, 2025
The penalty brings Pakistan's points percentage down to 24.31, only marginally above West Indies' 24.24 pic.twitter.com/0sx6IaYlfv
पाकिस्तानचे 5 गुण वजा
आयसीसीच्या नियमांनुसार, जर एखाद्या संघाने निर्धारित वेळेत सर्व षटके टाकली नाहीत, तर त्यानंतर टाकलेल्या प्रत्येक षटकासाठी मॅच फीच्या 5 टक्के दंड आकारला जातो. पाकिस्तानने निर्धारित वेळेत 5 षटके कमी टाकली. ज्यामुळे त्यांना 25 टक्के दंड आकारण्यात आला आणि कलम 16.11.2 नुसार, निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त टाकलेल्या प्रत्येक षटकावर एका गुणाचा दंड आकारण्यात आला. पाकिस्तानने 5 षटके टाकल्यामुळे त्यांच्या स्कोअरमधून 5 गुण वजा झाले. पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने गुन्ह्याची कबुली दिली होती.
हे ही वाचा -
Yuzvendra Chahal : महिनाभरापासून गायब युझवेंद्र चहल! लेग स्पिनरच्या आयुष्यात चाललंय काय?