Majha Gaon Majha Jilha at 630AM 08 January 2025 माझं गाव, माझा जिल्हा
Majha Gaon Majha Jilha at 630AM 08 January 2025 माझं गाव, माझा जिल्हा
तब्बल ५ महिन्यांनंतर कोल्हापुरातील विशाळगड पर्यटकांसाठी खुला, पर्यटकांना नियम व अटी घालून प्रशासनाने दिली परवानगी, ३१ जानेवारीपर्यंत सकाळी दहा ते संध्याकाळी पाच दरम्यान विशाळगडावर जाता येणार.
'माझा'च्या बातमीनंतर विठ्ठल मंदिरातील सुरक्षेचा ठेका रद्द, पैसे घेऊन दर्शन, भाविकांशी अरेरावीच्या ठेकेदार कंपनीविरोधात तक्रारी, मंदिर परिसरात मोकाट श्वान फिरतानाचा व्हिडीओ 'माझा'ने दाखवला होता.
तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला घटस्थापनेनं प्रारंभ, शाकंभरी नवरात्रोत्सवाचे यजमान विवेक गंगणे आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते घटस्थापना.
महाराष्ट्रातील पहिली कार्डियक लॅब धुळे शहरात उभारली, यात अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी देखील मोफत केली जाणार, आधार कार्ड आणि रेशन कार्ड याच्या आधारे ही तपासणी केली जाणार.
महाडमधील तळीये गावात दरडग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी म्हाडाच्या कोकण मंडळाचा २६३ घरांचा प्रकल्प, त्यापैकी ९२ घरांचं काम पूर्ण, तर दुसऱ्या टप्प्यातील उर्वरीत १०८ घरांचं काम जूनपर्यंत पूर्ण होणार.