Pakistan : शाहीन आफ्रिदी पाकिस्तानचा नवा कर्णधार, शान मसूदकडे कसोटीची जबाबदारी
Pakistan Cricket Team Captain: भारतात सुरु असलेल्या विश्वचषकातील पाकिस्तानला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे बाबर आझम आणि संघावर टीका झाली.
Pakistan Cricket Team Captain: भारतात सुरु असलेल्या विश्वचषकातील पाकिस्तानला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे बाबर आझम आणि संघावर टीका झाली. विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे. बाबर आझम याने तिन्ही प्रकारच्या क्रिकेट संघाच्या नेतृत्वाला रामराम ठोकला. त्यानंतर पाकिस्तान संघाने नव्या कर्णधाराची घोषणा केली. शान मसूद याला कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आलेय. तर वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीला टी 20 ची धुरा देण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली.
पाकिस्तान संघाने वनडेमध्ये खराब कामगिरी केली. पाकिस्तानने एकदिवसीय फॉरमॅटमध्ये खराब कामगिरी केली. परंतु पीसीबीने सध्या कसोटी आणि टी-20 फॉरमॅटचा नवा कर्णधार नियुक्त केला. पण वनडे फॉरमॅटचा नवा कर्णधार नियुक्त केलेला नाही. सुत्रांच्या माहितीनुसार, पीसीबी शाहीन शाह आफ्रिदीला वनडे फॉरमॅटचा कर्णधार बनवू शकते. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
पाकिस्तानला मिळाले नवे कर्णधार -
विश्वचषकात पाकिस्तान संघाचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. पाकिस्तानला नऊ सामन्यात फक्त चार विजय मिळवता आले. तर पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पाकिस्तान संघाला उपांत्य फेरीत स्थान पटकावता आले नाही. निराशाजनक कामगिरीनंतर पीसीबीने पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठे बदल केले. बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर पीसीबीने दोन्ही फॉरमॅटसाठी नवीन कर्णधारांच्या नावांची घोषणा केली. आता पाकिस्तान क्रिकेट टी-२० संघाचा कर्णधार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी असेल. तर कसोटी फॉरमॅटसाठी शान मसूदची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.
Presenting our captains 🇵🇰@shani_official has been appointed Test captain while @iShaheenAfridi will lead the T20I side. pic.twitter.com/wPSebUB60m
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 15, 2023
पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम याने आज पीसीबी चेअरमनसोबत आज चर्चा केली. त्यानंतर ट्वीटरद्वारे राजीनामा दिल्याची माहिती दिली. भारतात सुरु असलेल्या विश्वचषकात बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाने सुमार कामगिरी केली. पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये स्थान मिळवता आले नाही. पाकिस्तान संघाने आठ गुणांसह पाचव्या स्थानावर समाधान मानले. नऊ साखळी सामन्यात पाकिस्तानला फक्त चार विजय मिळवता आले. कर्णधार बाबर आझम याला स्पर्धेत एकही मोठी खेळी करता आली नाही. त्याच्याकडून पाकिस्तानला मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती, पण चाहत्याचा भंग झाला. नेतृत्वातही बाबर कमाल करु शकला नाही. त्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर टीका झाली होती. पाकिस्तानच्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी संघाच्या खराब कामगिरीसाठी बाबर आझमला जबाबदार धरले. आज बाबर आझम याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला.
कर्णधारपद सोडताना बाबर काय म्हणाला ?
2019 मध्ये मला पाकिस्तान संघाचे कर्णधारपद मिळाले. मागील चार वर्षांत मैदानावर आणि मैदानाबाहेर मी अनेक चढउतार पाहिले. पाकिस्तानचा सन्मान आणि आदर क्रिकेटविश्वात काय ठेवण्याचं ध्येय ठेवले. मर्यादित षटकात पाकिस्तान संघाला नंबर 1 पर्यंत पोहचवले. त्यासाठी प्रशिक्षक, सहकारी यांच्यासह सर्व चाहत्यांचा मोलाचा वाटा राहिला. माझ्या प्रवासात चाहत्यांच्या पाठिंबाही महत्वाचा आहे.
आज मी तिन्ही प्रकारचं कर्णधारपद सोडत आहे. माझ्यासाठी हे कठीण आहे, पण यावेळी हा निर्णय घ्यावाच लागेल. पाकिस्तानसाठी खेळणं सुरुच ठेवणार आहे. नवीन कर्णधाराला माझा पूर्णपणे पाठिंबा असेल. आतापर्यंत सपोर्ट करणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे आणि चाहत्यांचे खूप सारे आभार...