(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pak vs Eng : इंग्लंडविरुद्ध पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघात भूकंप; बाबरसह 4 दिग्गज खेळाडू बाहेर, PCBची घोषणा
Shaheen Afridi-Babar Azam dropped : इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या
Pakistan cricket Team Squad for England Test : इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर संघात 4 मोठे बदल करण्यात आले आहेत, ज्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. तीन माजी कर्णधार आणि एका युवा वेगवान गोलंदाजाला पाकिस्तान संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
खरंतर, पाकिस्तान क्रिकेट संघाने दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी जाहीर केलेल्या संघात पाकिस्तानचे माजी कर्णधार बाबर आझम, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि सरफराज अहमद यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्याचबरोबर कर्णधारपद वाचवण्यासाठी शान मसूदला आणखी एक संधी देण्यात आली आहे. शान मसूदशिवाय सौद शकीलने उपकर्णधारपद कायम ठेवले आहे. या चार खेळाडूंच्या जागी हसीबुल्ला, मेहरान मुमताज, कामरान गुलाम, वेगवान गोलंदाज मोहम्मद अली आणि ऑफस्पिनर साजिद खान यांचा समावेश करण्यात आला आहे. सुरुवातीला पहिल्या कसोटी संघाचा भाग असलेला पण नंतर बाहेर केलेल्या नोमान अली आणि जाहिद महमूद यांचाही 16 खेळाडूंच्या संघात समावेश करण्यात आला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ -
शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, हसीबुल्ला (विकेटकीपर), कामरान गुलाम, मेहरान मुमताज, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), नोमान अली, सईम अयुब, साजिद खान, सलमान अली आगा आणि जाहिद मेहमूद.
🚨 Pakistan name squad for second and third Tests against England 🚨#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/EHS9m84TXK
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 13, 2024
बाबर आझम देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतणार?
दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडल्यानंतर आता बाबर पाकिस्तानच्या देशांतर्गत प्रथम श्रेणी स्पर्धेच्या आगामी कायद-ए-आझम ट्रॉफीत खेळणार की नाही हे पाहायचे आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो या स्पर्धेत सहभागी झालेला नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याला दोन डावांत केवळ 35 धावा करता आल्या. गेल्या 18 डावात त्याने एकही अर्धशतक झळकावलेले नाही आणि अपेक्षेप्रमाणे त्याच्यावरील दबाव वाढला आहे.
पाकिस्तानला 15 ऑक्टोबरपासून मुल्तानमध्ये इंग्लंडविरुद्ध दुसरी कसोटी खेळायची आहे. पहिल्या कसोटीत ज्या खेळपट्टीचा वापर करण्यात आला होता त्याच खेळपट्टीवर हा सामना होणार असल्याचे मानले जात आहे. तिसरी कसोटी 24 ऑक्टोबरपासून रावळपिंडी येथे होणार आहे.
हे ही वाचा -
Ind vs Ban : टी-20 मालिका संपली अन् 'या' खेळाडूची कारकीर्दही, शेवटच्या सामन्यात किती केल्या धावा?