PAK vs NZ : 145 वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच झालं असं काही, पाकिस्तानच्या नावे आणखी एक लाजिरवाणा रेकॉर्ड
Pakistan vs New Zealand : सध्या न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर असून कसोटी सामने खेळवले जात आहेत.
Pakistan vs New Zealand Test : पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ) यांच्यात सध्या कसोटी मालिका सुरु असून पहिला सामना कराचीमध्ये खेळवला जात आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान नॅशनल स्टेडियमवर खेळवल्या जात असलेल्या या कसोटीत एक नकोसा विक्रम पाकिस्तानच्या नावे झाला आहे. एखाद्या संघाच्या पहिल्या दोन विकेट स्टंपिंगद्वारे बाद झाल्याची कसोटी क्रिकेटमधील ही पहिलीच वेळ आहे.
शफीक-शानच्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड
145 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आणि आतापर्यंत खेळलेल्या 2 हजार 484 सामन्यांमध्ये कोणत्याही संघाचे पहिले दोन फलंदाज स्टंपिंगने बाद झालेले नाहीत. पण हा नकोसा विक्रम पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराचीमध्ये खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात झाला. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या अब्दुल्ला शफिकला एजाज पटेलच्या चेंडूवर यष्टिरक्षक टॉम ब्लंडेलने बाद केले. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शान मसूदला मायकल ब्रासवेलच्या चेंडूवर ब्लेंडलने स्टपिंग केले. अशाप्रकारे, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एखाद्या संघाच्या पहिल्या दोन विकेट स्टंपिंगद्वारे बाद झाल्याची घटना घडली आहे.
बाबर आझमनं सावरला डाव
पाकिस्तानने 19 धावांत दोन विकेट गमावल्या होत्या. यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या बाबर आझमने जबाबदारी स्वीकारली. बाबर आझमने इमाम-उल-हकसोबत 29 आणि सौद शकीलसोबत 62 धावांची भागीदारी करून संघाला अडचणीतून बाहेर काढले. यानंतर बाबरने माजी कर्णधार सर्फराज अहमदसोबत उत्कृष्ट भागीदारी करत संघाला सामन्यात पुनरागमन मिळवून दिले. बाबर आझमने सामन्यात शतकही झळकावलं. बाबरनं 161 चेंडूत 103 धावा करत शतक पूर्ण केलं असून त्याने पुढेही संघाचा डाव सावरला, त्याच्या या कामगिरीमुळेच पाकिस्तानला चांगली धावसंख्या उभारण्यात यश मिळालं आहे.
View this post on Instagram
हे देखील वाचा-