Dean Elgar: यालाच म्हणतात नशिबाची साथ मिळणं! कट अॅण्ड बोल्ड होऊनही डीन एल्गर ठरला नॉटआऊट, पाहा व्हिडिओ
Dean Elgar Freak Survival: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (Melbourne Cricket Ground) दुसरा कसोटी सामना खेळला जातोय.
Dean Elgar Freak Survival: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (Melbourne Cricket Ground) दुसरा कसोटी सामना खेळला जातोय. या सामन्याच्या सुरुवातीपासूनच चाहत्यांना एकापेक्षा एक मनोरंजक दृश्य पहायला मिळालं. यापैकी एक म्हणजे, डीन एल्गर कट अॅण्ड बोल्ड झाल्यानंतरही नॉट ठरला. डीन एल्गरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावातील 13 व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंड गोलंदाजी करता होता. या षटकातील एका चेंडूवर कट अॅण्ड बोल्ड झाला. पण बेल्स स्टंप्सवरून खाली न पडल्यानं त्याला नॉटआऊट ठरला. यानंतर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू नॅथन लायन एल्गरला स्लेज करताना दिसत आहे. त्यानं एल्गारला म्हटलं की 'मला वाटते की ही तुला सांतानं ख्रिसमस भेट दिली. एल्गारनंही लायनच्या स्लेजला उत्तर देत 'मी चांगला मुलगा आहे' असं म्हटलं.
व्हिडिओ-
How many times have we seen that one!?
— OneCricket (@OneCricketApp) December 26, 2022
Dean Elgar with the rub of the green!#AUSvSA #BoxingDayTestMatch #TestCricket pic.twitter.com/7Xnsq1L1hm
दक्षिण आफ्रिकेचा डाव 189 धावांवर आटोपला
मेलबर्न येथे सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या 189 धावांवर आटोपला आहे. दक्षिण आफ्रिकेकडून वेरीनेन (52) आणि मार्को जेन्सेन यांनी 59 धावांची खेळी केली. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या कोणत्याही फलंदाजाला काही खास कामगिरी करता आली. ऑस्ट्रेलियाकडून युवा अष्टपैलू कॅमेरून ग्रीननं शानदार गोलंदाजी करत पाच विकेट्स घेतल्या. तर, स्टार्कनं दोन विकेट्स घेतल्या. या कसोटी मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियानं जिंकला.
ऑस्ट्रेलियाचा संघ:
डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.
दक्षिण आफ्रिकेचा संघ:
डीन एल्गर (कर्णधार), सारेल एरवी, थ्युनिस डी ब्रुइन, टेम्बा बावुमा, खाया झोंडो, काइल वेरेने (विकेटकिपर), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, अॅनरिक नॉर्टजे, लुंगी एनगिडी.
हे देखील वाचा-