एक्स्प्लोर

सामना बांगलादेश-अफगाणिस्तानचा अन् घोषणा कोहली कोहलीच्या, नेमका काय प्रकार

Virat Kohli and Naveen-Ul-Haq : अफगाणिस्तानला विश्वचषकातील आपल्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

Virat Kohli and Naveen-Ul-Haq : अफगाणिस्तानला विश्वचषकातील आपल्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. नवीन उल हक फिल्डिंग करत असताना प्रेक्षकांनी कोहली कोहलीच्या घोषणा दिल्या. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 2023 आयपीएल सामन्यादरम्यान विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर भारतीय चाहत्यांनी नवीनला विराट कोहलीच्या नावाने ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. शनिवारी बांगलादेशविरोधात अफगाणिस्तानचा सामना झाला, या सामन्यावेळी विराट कोहलीच्या चाहत्यांनी नवीन उल हक याची फिरकी घेतली. नवीन उल हक याला पाहून स्टेडिअममधील चाहत्यांनी कोहली कोहलीच्या घोषणा दिल्या. 

यंदाचा विश्वचषक भारतात होत आहे. यामधील तिसरा सामना अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यामध्ये धर्मशाला येथे पार पाडला. या सामन्यात नवीन उल हकला पाहून कोहली कोहली अशा घोषणा देऊन चाहत्यांनी डिवचलेय. चाहत्यांनी नवीनला पाहताच कोहली कोहली असा नारा द्यायला सुरुवात केला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

नवीन उल हक फिल्डिंगसाठी सीमारेषेजवळ आला, त्याचवेळी स्टँडमध्ये उपस्थित प्रेक्षकांनी 'कोहली-कोहली' अशी जोरात घोषणाबाजी सुरु केल्याचे व्हिडीओत दिसतेय. नवीन उल हक याने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचेही व्हिडीओत दिसतेय. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे, ज्यामध्ये कोहली आणि नवीन उल एकमेकांविरुद्ध खेळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्या सामन्याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. 

अफगाणिस्तानचा पहिल्याच सामन्यात पराभव

मेहंदी हसन मिराझची शानदार अष्टपैलू खेळी (3-25 आणि 57 धावा), शकीब अल हसनच्या (3-30) आणि नजमुल शांतोच्या 58 नाबाद खेळीच्या जोरावर धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने अफगाणिस्तानवर (Bangladesh vs Afghanistan) सहा विकेट्स राखून विजय मिळवत वर्ल्डकपमध्ये (ICC Cricket World Cup 2023) शानदार सुरुवात केली.  बांगलादेशने वर्ल्डकपमध्ये पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानला अवघ्या 156 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर 34.4 षटकामध्ये चार गड्यांच्या मोबदल्यात पार केले. बांगलादेशच्या विजयाचा शिल्पकार मेहंदी हसन मिराझ ठरला. त्याने तीन गडी बाद करतानाही शानदार अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे बांगलादेशला विजयाच्या समीप गेला. नजमूल शांतोने नाबाद 59 धावांची संयमी खेळी करत त्याला उत्तम साथ दिली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Sangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसलेRavindra Dhangekar On Pune Car Accindet Case :2 निलंबित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हायला हवी होतीAditya Thackeray On EVM Hacked : फसवणूक करणाऱ्यांना शपथ देणार का? ईव्हीएमवरून आरोप प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
Embed widget