(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India tour of New Zealand 2022: भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यातील वेळापत्रक जाहीर; कधी, कुठं रंगणार सामने?
India tour of New Zealand 2022: ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झालाय. भारताचा एक संघ सध्या मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे.
India tour of New Zealand 2022: ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झालाय. भारताचा एक संघ सध्या मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघ न्यूझीलंडचा (NZ vs IND) दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे.
टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौरा करणार आहे. दरम्यान, 18 नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 13 दिवसांत 6 सामने खेळले जातील, ज्यात तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे. आगामी टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना 13 नोव्हेंबरला होणार आहे. त्यानंतर पाच दिवसांनी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात द्विपक्षीय मालिका खेळली जाईल.
कधी, कुठं रंगणार सामने?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना 18 नोव्हेंबर रोजी वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर खेळला जाईल. त्यानंतर दुसरा टी-20 सामना 20 नोव्हेंबर आणि तिसरा टी-20 सामना 22 नोव्हेंबर रोजी अनुक्रमे माउंट मॉन्गनुई आणि नॅपियर येथे खेळला जाईल. दरम्यान, एकदिवसीय मालिकेला 25 नोव्हेंबर ईडन पार्क येथे होईल. त्यानंतर दुसरा एकदिवसीय सामना 27 नोव्हेंबर रोजी सीडन पार्क आणि तिसरा एकदिवसीय साममना 30 नोव्हेंबर रोजी हेग्ले ओवल येथे पार पडणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेच वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 18 नोव्हेंबर | वेलिंग्टन |
दुसरा टी-20 सामना | 20 नोव्हेंबर | माउंट मॉन्गनुई |
तिसरा टी-20 सामना | 22 नोव्हेंबर | नॅपियर |
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 25 नोव्हेंबर | ऑकलँड |
दुसरा एकदिवसीय सामना | 27 नोव्हेंबर | हेमिल्टन |
तिसरा एकदिवसीय सामना | 30 नोव्हेंबर | क्राइस्टचर्च |
हे देखील वाचा-