(Source: ECI/ABP News/ABP Majha)
श्रीलंकेचा मुरलीधरन भारतात 1400 कोटी गुंतवणार! 46 एकरवर उभा राहणार प्रोजेक्ट
Muttiah Muralitharan : श्रीलंकेचा दिग्गज माजी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन भारतामध्ये 1400 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
Muttiah Muralitharan : श्रीलंकेचा दिग्गज माजी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन भारतामध्ये 1400 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कर्नाटकमध्ये मुथय्या मुरलीधरन कर्नाटकमध्ये आपला व्यावसाय सुरु करणार आहे, त्यासाठी याआधीच 46 एकर जमीन मिळाली आहे. आज मुथय्या मुरलीधरन यानं कर्नाटकच्या मंत्र्यांची भेट घेतली. क्रिकेटमध्ये दुसरा टाकणाऱ्या प्रसिद्ध असणारा मुरलीधरन आता खरचं क्रिकेटशिवाय दुसरा व्यावसाय करणार आहे. कर्नाटकमध्ये फॅक्टरी टाकण्यात येणार आहे, पुढील वर्षांपासून प्रॉडक्शनला सुरुवात होणार असल्याचे समोर आलेय.
मुथय्या मुरलीधरन कर्नाटकमधील चामराजनगर जिल्ह्यामध्ये सॉफ्ट ड्रिंक्स आणि कन्फेक्शनरी यूनिट सुरु करणार आहे. हे युनिट वेगवेगळ्या टप्प्यात विकसित करण्यात येणार आहे.त्यासाठी एकूण 1,400 कोटी रुपये खर्च येणार आहे.
मुथथ्या मुरलीधरनचा प्लॅन तयार -
मुथय्या मुरलीधरन याच्या गुंतवणुकीबाबतची माहिती कर्नाटकचे अवजड, उद्योग मंत्री एम.बी. पाटील यांनी दिली आहे. याबाबत मंत्री पाटील आणि मुथय्या मुरलीधरन यांची नुकतीच भेट झाली आणि त्यानंतर त्यांनी हे अपडेट शेअर केले. मुथय्या मुरलीधरन राज्यात अनेक टप्प्यांत गुंतवणूक करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
Muttiah Muralitharan to invest 1,400cr in a beverage and confectionery unit in Karnataka. pic.twitter.com/M1h3Ach3RV
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 19, 2024
कर्नाटकचे उद्योग मंत्री एमबी पाटील यांच्या कार्यलयाकडून जारी झालेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलेय की, श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू मुरलीधरन 'मुथिया बेव्हरेजेस अँड कन्फेक्शनरीज' या कंपनीच्या अंतर्गत कारखाना उभारणार आहे. येथे तो सॉफ्ट ड्रिंक्स आणि कन्फेक्शनरी उत्पादने तयार करेल. मुरलधीरन ही उत्पादने फक्त भारतातच बनवणार आहे की भारतीय बाजारपेठेत विकणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन याला फिरकीचा जादूगार म्हटले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. मुरलीधरनने 495 सामन्यांत 1347 विकेट घेतल्या आहेत. त्याने 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. त्यानं आतापर्यंत अनेक संघांसाठी प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. याशिवाय तो एक यशस्वी व्यवसायही चालवत आहे. मुरलीधरन आयपीएलमध्येही खेळला आहे.