अजिंक्य रहाणेच पुनरागमन होऊ शकते तर विराटही पुन्हा कर्णधार होऊ शकतो, माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य
Virat Kohli : अजिंक्य रहाणे यांच 18 महिन्यानंतर टीम इंडियात पुनरागमन झालेय..त्याचं फक्त कमबॅक झाले नाही तर त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपण्यात आली
MSK Prasad On Virat Kohli : अजिंक्य रहाणे यांच 18 महिन्यानंतर टीम इंडियात पुनरागमन झालेय..त्याचं फक्त कमबॅक झाले नाही तर त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपण्यात आलेली आहे. इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये रहाणे याने दमदार फलंदाजी करत सर्वांनाच प्रभावित केले होते. भारतीय संघ वेस्ट इंडिजविरोधात दोन कसोटी सामने खेळणार आहे... बुधवारपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वीच भारतीय संघाच्या माजी खेळाडूने मोठं वक्तव्य केलेय. विराट कोहलीला पुन्हा एकदा भारतीय संघाचे कर्णधारपद द्यायला हवे, असे वक्तव्य माजी निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी केलेय.
विराट कोहलीला पुन्हा कसोटी संघाचं कर्णधार का नाही केले जाऊ शकत -
भारतीय संघाचा माजी निवड समिती अध्यक्ष एसएसके प्रसाद म्हणाले की, विराट कोहलीला पुन्हा एकदा कसोटी संघाचं कर्णधारपद का केले जात नाही ? जर अजिंक्य रहाणे याचं कसोटी संघात पुनरागमन होऊ शकते, त्याला उपकर्णधारपद दिले जाते.. तर विराट कोहलीला पुन्हा कर्णधार का केले जात नाही? असा सवाल प्रसाद यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, कर्णधारपदावर विराट कोहलीचं काय मत आहे, हे मला माहित नाही. पण विराट कोहलीला पुन्हा एकदा कसोटी कर्णधार केले जाऊ शकते.
MSK Prasad said, "why not give Virat Kohli Test captaincy again? When Ajinkya Rahane can come back and become the vice-captain, then why not Virat Kohli? I don't know what the mindset of Virat is on captaincy". (KhelNow). pic.twitter.com/GCzjvnsaMK
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 10, 2023
रोहित शर्माच्या जागी विराट कोहलीला करा कर्णधार -
एमएस धोनी याच्या नंतर विराट कोहलीने भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपद सांभाळले होते. कसोटीमध्ये विराट कोहलीने दमदार कामगिरी केली आहे. विराट कोहली भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असल्याचे आकडे सांगतात. विराट कोहलीच्या फलंदाजीमध्ये चढ-उतार पाहायला मिळाला, त्यानंतर कर्णधारपद सोडले. विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्मा याला कसोटीची धुरा सोपवण्यात आली. रोहित शर्मा कसोटी, वनडे आणि टी 20 संघाचा कर्णधार आहे. आता रोहित शर्माच्या जागी विराट कोहलीला कर्णधार करा, अशी मागणी एसएसके प्रसाद यांनी केली आहे.
खालील बातम्या वाचायला विसरु नका:
IND vs WI : वेस्ट इंडिजमध्ये भारताची कामगिरी कशी? कसोटी मालिकेपूर्वी ही आकडेवारी वाचाच