एक्स्प्लोर

India Tour of West Indies : मिशन वेस्ट इंडिज! 12 जुलैपासून कॅरेबिअनसोबत भिडणार रोहित अॅण्ड कंपनी, संपूर्ण माहिती एका क्लिकवर

India Tour of West Indies 2023 : वेळापत्रक, भारतीय संघ, कुठे पाहाल सामना.... संपूर्ण माहिती एका क्लिकवर

India Tour of West Indies 2023 All You Need to Know : टीम इंडियाच्या वेस्ट इंडिजविरोधातील अभियानाला 12 जुलैपासून सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा अॅण्ड कंपनी वेस्ट इंडिजमध्ये कॅरिबिअन आर्मीसोबत दोन हात करणार आहे. 12 जुलै ते 13 ऑगस्ट यादरम्यान टीम इंडिया वेस्ट इंडिजमध्ये दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी20 सामने खेळणार आहे. महिनाभर टीम इंडिया वेस्ट इंडिजमध्ये मुक्कामी असणार आहे. विंडीज दौरा भारताच्या पुढील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलची सुरुवात देखील करेल. याबरोबरच टीम इंडियाला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची तयारी करण्याची संधी मिळणार आहे. भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.. (IND vs WI Test Schedule, Full Squads, Venues, Strongest Playing XI, Timing, Streaming and Broadcasting Details | India Tour of West Indies 2023)

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची निवड केलेली आहे. कसोटी आणि एकदिवसीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माच्या खांद्यावर आहे. पण टी20 रोहित शर्मा आणि विराट कोहली यासारख्या सिनिअर खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. हार्दिक पांड्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. पाहूयात टीम इंडियाचे कसोटी, वनडे आणि एकदिवसीय संघात कोण कोण आहे. IND vs WI Full Squads

वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी कसोटी संघ 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, यशस्वी जयसवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.

कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ - 

क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवुड (उपकर्णधार), एलिक अथानाजे, तेजनारायण चंद्रपॉल, रहकीम कॉर्नवाल, जोशुआ डिसिल्वा, शेनन गेब्रियल, जेसन होल्डर, अल्जारी जोसेफ, किर्क मॅकेंजी, रेमन रीफर, केमार रोच आणि जोमेल वारिकन.

वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी वनडे संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार. 

टी20साठी भारतीय संघ -

इशान किशन (विकेटकिपर) , शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उप कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकिपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार

सामन्याची वेळ काय ? Timing

भारतीय वेळेनुसार, कसोटी सामने संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होणार आहेत. तर एकदिवसीय सामने सात वाजता सुरुवात होणार आहेत. टी20 सामन्याला रात्री 8 वाजता सुरु होणार आहे.

कुठे पाहाल सामना? IND vs WI Broadcasting and Streaming Details

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी, वनडे आणि टी20 सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहाता येतील.. हॉटस्टारवर या अॅपवरुन तुम्ही सामन्याचा आनंद घ्याल...  काही रिपोर्ट्सनुसार, जिओ सिनेमावर मोफत सामने पाहाता येणार आहेत. एबीपी माझाच्या संकेतस्थळावरही तुम्हाला याची सविस्तर माहिती मिळणार आहे. 

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणाऱ्या कसोटी, वनडे आणि टी 20 सामन्याचे संपूर्ण वेळापत्रक... IND vs WI schedule

कसोटी सामने (संध्याकाळी साडेसात वाजता)

12 ते 16 जुलै 2023 - पहिला कसोटी सामना
ठिकाण - विंडसर पार्क, डोमिनिका

20 ते 24 जुलै 2023 - दुसरा कसोटी सामना 
ठिकाण - क्विन्स पार्क ओव्हल पोर्ट , त्रिनिदाद

वनडे सामने - (संध्याकाळी सात वाजता) 

27 जुलै 2023 - पहिला एकदिवसीय सामना
ठिकाण - किंग्सटन, ओव्हल बारबाडोस

29 जुलै 2023 - दुसरा एकदिवसीय सामना
ठिकाण - किंग्सटन, ओव्हल बारबाडोस

1 ऑगस्ट 2023 - तिसरा एकदिवसीय सामना
ब्रायन लारा क्रिकेट अॅकेडमी, त्रिनिदाद

टी 20 सामने (संध्याकाळी 8 वाजता)

3 ऑगस्ट 2023 - पहिला टी20 सामना
ब्रायन लारा क्रिकेट अॅकेडमी, त्रिनिदाद

6 ऑगस्ट 2023 - दुसरा टी20 सामना
नॅशनल स्टेडिअम, गयाना

8 ऑगस्ट 2023 - तिसरा टी20 सामना
नॅशनल स्टेडिअम, गयाना

12 ऑगस्ट 2023 - चौथा टी20 सामना
सेन्ट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियम, फ्लोरिडा 

13 ऑगस्ट 2023 - पाचवा टी20 सामना
सेन्ट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियम, फ्लोरिडा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prayagraj Mahakumbh Delhi : महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांचा चेंगराचेंगरीत मृत्यू Special ReportBhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special ReportMumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special ReportAjit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.