Virat Kohli : कोहलीमुळे बदललं मोहम्मद सिराजचं आयुष्य, प्लेईंग 11 मध्ये स्थान देणं विराटचा निर्णय; दिनेश कार्तिकनं सांगितली सिराजच्या करियरची कहाणी
Mohammed Siraj : भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने मोहम्मद सिराजच्या करिअरमधील एक मोठा किस्सा सांगितला आहे. सिराजच्या करिअरमध्ये कोहलीचा मोठा वाटा आहे.
Virat Kohli backed Mohammed Siraj : भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) ने मोहम्मद सिराजच्या (Mohammed Siraj) करिअरमधील एक मोठा किस्सा सांगितला आहे. या घटनेमुळेच सिराजच्या आयुष्याला कलाटणी आणि त्याच्या करिअरला नवी दिशा मिळाली असंही दिनेशने सांगितलं आहे. दिनेश कार्तिकने एका कार्यक्रमात वक्तव्य करताना सांगितलं की, ''विराट कोहलीमुळे (Virat Kohli) मोहम्म्द सिराजचं आयुष्य बदललं. त्यामुळेच सिराज कोहलीला मोठ्या भावाप्रमाणे मानतो.''
कोहलीमुळे बदललं मोहम्मद सिराजचं आयुष्य
दिनेश कार्तिकने सांगितलं की, ''विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असताना अनेक युवा खेळाडूंनी भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केलं आणि ते टीमचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. पण काही खेळाडूंसाठी हे फार सोपं नव्हतं. त्यामधील एक म्हणजे मोहम्मद सिराज. विराट कोहलीने सिराजला पाठिंबा दिला त्यामुळे सिराजला चांगली संधी मिळाली आणि ती त्याने सार्थ ठरवली.''
कोहलीचा वेळोवेळी सिराजला पाठिंबा
दिनेश कार्तिकने सांगितलं की, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने आपल्या कर्णधारपदाखाली अनेक खेळाडूंना साथ दिली यामुळे अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली. पण मोहम्मद सिराजवर त्याचे खूप प्रेम होतं आणि परिणामी सिराज आता भारताचा नंबर वन गोलंदाज आहे. भारतीय संघातील युवा वेगवान गोलंदाज सिराजला विराट कोहलीचा जबरदस्त पाठिंबा कसा मिळाला, हे दिनेश कार्तिकने सांगितलं आहे.
''कोहलीला संघात मोहम्मद सिराज हवा होता''
क्रिकबझच्या (CricBuzz) शो राइज ऑफ न्यू इंडियामध्ये (Rise of New India), दिनेश कार्तिकने सिराज आणि कोहलीबाबतचा किस्सा सांगितला आहे. कार्तिकने सांगितली की, कोहलीला त्याच्या संघात नेहमीच सिराज हवा होता. निवड अधिकारी मोहम्मद सिराजला वगळणार होते पण विराट कोहलीने त्याला पाठिंबा दिला. विराटने त्यावेळी सांगितले की, ''मला माझ्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोहम्मद सिराज हवा आहे.''
दिनेश कार्तिकनं सांगितली सिराजच्या करियरची कहाणी
मोहम्मद सिराजने आयपीएममध्ये रॉयल चॅलेंजर बंगळुरू (RCB) संघातून पदार्पण केलं. यावेळी सिराजने केकेआर (KKR) विरुद्धही शानदार खेळी केली. त्याने 3 विकेट्स घेतल्या आणि KKRला 100 धावांच्या आत ऑलआऊट करण्यात मोठं योगदान दिलं आणि तेथून त्याच्या T20 कारकिर्दीचा आलेख वाढताच पाहायला मिळाला. तो लहान शहरातून आलेला एक चांगला खेळाडू आहे. त्याच्या कहाणीतून अनेकांनी प्रेरणा घ्यावी.