Mohammed Siraj : टीम इंडियामधून वगळल्यानंतर DSP सिराजने उचलले मोठे पाऊल, अचानक घेतला 'हा' निर्णय
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
Mohammed Siraj Ranji Trophy : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. निवडकर्त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची निवड न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. आता टीम इंडियामधून वगळल्यानंतर मोहम्मद सिराजने एक मोठे पाऊल उचलले आहे. मोहम्मद सिराज 30 जानेवारीपासून विदर्भाविरुद्ध सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी सामन्यात खेळू शकतो.
23 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या टप्प्यात हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने म्हटले आहे की, भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज 30 जानेवारी रोजी विदर्भाविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असू शकतो. रणजी ट्रॉफीच्या एलिट ग्रुप बी टेबलमध्ये हैदराबाद पाच सामन्यांतून नऊ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.
हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन मोहन राव म्हणाले की, 23 जानेवारी रोजी होणाऱ्या सामन्यासाठी सिराज का उपलब्ध आहे की नाही हे माहिती नाही. पण सिराज नागपूरमध्ये 30 जानेवारी रोजी टेबल टॉपवर असलेल्या विदर्भाविरुद्धच्या त्यांच्या पुढील रणजी ट्रॉफी सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सिराजची भारतीय संघात निवड झाली नाही.
सिराजचा वनडे सामन्यांमध्ये उत्कृष्ट रेकॉर्ड
2022 ते 2024 या कालावधीत एकदिवसीय सामन्यांमध्ये सिराजने 22.97 च्या सरासरीने 71 विकेट्स घेतल्या आहेत, जे या कालावधीत भारतीय वेगवान गोलंदाजाने घेतलेले सर्वाधिक विकेट्स आहेत. त्याच्या जागी भारतीय संघात डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, तसेच जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या आणि हर्षित राणा (फक्त इंग्लंड एकदिवसीय सामन्यांसाठी समाविष्ट) यांचा समावेश आहे. सिराजने अलीकडेच ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पाचही कसोटी सामन्यांमध्ये 31.15 च्या सरासरीने 20 विकेट्स घेतल्या.
दुखापतीमुळे विराट कोहली बाहेर
सध्या, रवींद्र जडेजा (सौराष्ट्र), ऋषभ पंत (दिल्ली), शुभमन गिल (पंजाब), रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल (दोघेही मुंबई) रणजी ट्रॉफीच्या आगामी फेरीत आपापल्या संघांकडून खेळतील, तर केएल राहुल आणि विराट कोहली दुखापतींमुळे बाहेर आहे. बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभाग अनिवार्य करणारा 10-कलमी धोरण दस्तऐवज जारी केल्यानंतर आणि त्याचे पालन न केल्यास आंतरराष्ट्रीय निवड आणि केंद्रीय करार नूतनीकरणावर परिणाम होऊ शकतो, त्यानंतर रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी उपलब्ध होणाऱ्या भारतीय खेळाडूंची संख्या वाढली आहे.
हे ही वाचा -