एक्स्प्लोर

Mohammed Siraj on Travis Head : चल निकल.... DSP सिराजने ट्रॅव्हिस हेडचा केला चोख बंदोबस्त! दोघांमध्ये जोरदार बाचाबाची; पहा व्हिडिओ

India vs Australia 2nd Test : ॲडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा दिसत आहे. याचे कारण म्हणजे ट्रॅव्हिस हेड.

Mohammed Siraj on Travis Head : ॲडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा दिसत आहे. याचे कारण म्हणजे ट्रॅव्हिस हेड. हेडने जबरदस्त शतक झळकावले आणि ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 300 च्या पुढे नेली, त्यामुळे कांगारू संघ मोठ्या आघाडीकडे वाटचाल करत आहे. हेडने शानदार फलंदाजी करत 141 चेंडूत 140 धावांची खेळी केली. त्याची विकेट मोहम्मद सिराजने घेतली. मात्र, सिराजने त्याला बाद केल्याने दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली आणि वातावरण चांगलेच तापले. 

DSP सिराजने ट्रॅव्हिस हेडचा केला चोख बंदोबस्त

सिराजने ट्रॅव्हिस हेडला क्लीन बोल्ड केले. हेडला सिराजचा यॉर्कर समजू शकला नाही आणि आऊट झाला. त्याने 141 चेंडूत 17 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 140 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. विकेट पडल्यानंतर सिराज आणि हेड यांच्यात बाचाबाची झाली. ज्याचा व्हिडिओ आता सोशल माडियावर व्हायरल होत आहे. विकेट घेतल्यानंतर सिराज ट्रॅव्हिस हेडला चल निघ बोला... यावर हेड पण कायतरी बोलून तेथून निघून गेला.

ट्रॅव्हिस हेडने 140 धावांची स्फोटक खेळी करत सामन्यात ऑस्ट्रेलियाची स्थिती मजबूत केली. ॲडलेड कसोटीत टीम इंडिया बॅकफूटवर असल्याचे दिसत आहे. 80 षटकांनंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नवीन चेंडू घेण्याचा निर्णय घेतला आणि मोहम्मद सिराजने 82 व्या षटकात ट्रॅव्हिस हेडला क्लीन बॉलिंग करून भारतीय चाहत्यांना दिलासा दिला.

ट्रॅव्हिस हेडला आऊट केल्यानंतर सिराज खूपच संतापलेला दिसत होता. त्याच्या डोळ्यात आग स्पष्ट दिसत होती. तो ऑस्ट्रेलियन फलंदाजाला काहीतरी म्हणाला, ट्रॅव्हिस हेडही शतक झळकावून बाद झाला होता, त्यामुळे त्यानेही सिराजला प्रत्युत्तर दिले. या घटनेनंतर ॲडलेड ओव्हलवर उपस्थित असलेल्या ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी आवाज काढण्यास सुरुवात केली.

टीम इंडिया 180 धावांवर गडगडली

ॲडलेड कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मिचेल स्टार्कसमोर भारतीय फलंदाज हतबल दिसत होते आणि संपूर्ण संघ 180 धावांवर गडगडला. स्टार्कने पहिल्या डावात 6 विकेट घेतल्या होत्या. भारताकडून अष्टपैलू नितीश रेड्डी याने सर्वाधिक 42 धावा केल्या.

हे ही वाचा -

Ind vs Aus 2nd Test Travis Head : सिराज अन् पंतची चूक टीम इंडियाला पडली महागात.... ट्रॅव्हिस हेडचा तांडव, ठोकले तुफानी शतक

IND VS AUS : कसोटी सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा; मिचेल मार्श आऊट की नॉट आऊट; विराट कोहली थेट अंपायरशी भिडला...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गोंदियात मोबाईल स्फोटमध्ये शिक्षकाचा मृत्यू, टेक्निकल एक्स्पर्टने सांगितलं कारण, दिला सल्ला
गोंदियात मोबाईल स्फोटमध्ये शिक्षकाचा मृत्यू, टेक्निकल एक्स्पर्टने सांगितलं कारण, दिला सल्ला
Places Of Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
प्रार्थनास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Mumbai Porsche Car Accident : मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण, भरधाव कारची दुचाकींना धडक; बड्या उद्योगपतीच्या पुत्राचा प्रताप
मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण, भरधाव कारची दुचाकींना धडक; बड्या उद्योगपतीच्या पुत्राचा प्रताप
ब्रँडेड पेंटच्या नावाखाली गोवामेड दारुची तस्करी, 600 बॉक्स व्हिस्की, 110 बॉक्स बिअर जप्त
ब्रँडेड पेंटच्या नावाखाली गोवामेड दारुची तस्करी, 600 बॉक्स व्हिस्की, 110 बॉक्स बिअर जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Narvekar Assembly Speaker Fill Form : पक्षाचा निर्णय मान्य असेल,  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर भरणार अर्जABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 07 December 2024Jyoti Gaikwad - Varsha Gaikwad : वर्षा गायकवाडांची बहीणीसोबत एन्ट्री,वडिलांच्या आठवणीने डोळे पाणावलेAbu Azmi Left MVA : विरोधकांचा आमच्याशी काही संबंध नाही, अबू आझमींचा मविआवर गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोंदियात मोबाईल स्फोटमध्ये शिक्षकाचा मृत्यू, टेक्निकल एक्स्पर्टने सांगितलं कारण, दिला सल्ला
गोंदियात मोबाईल स्फोटमध्ये शिक्षकाचा मृत्यू, टेक्निकल एक्स्पर्टने सांगितलं कारण, दिला सल्ला
Places Of Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
प्रार्थनास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Mumbai Porsche Car Accident : मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण, भरधाव कारची दुचाकींना धडक; बड्या उद्योगपतीच्या पुत्राचा प्रताप
मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण, भरधाव कारची दुचाकींना धडक; बड्या उद्योगपतीच्या पुत्राचा प्रताप
ब्रँडेड पेंटच्या नावाखाली गोवामेड दारुची तस्करी, 600 बॉक्स व्हिस्की, 110 बॉक्स बिअर जप्त
ब्रँडेड पेंटच्या नावाखाली गोवामेड दारुची तस्करी, 600 बॉक्स व्हिस्की, 110 बॉक्स बिअर जप्त
सचिन तेंडुलकरचा कडक संदेश; चाचपडत असलेल्या अन् टीकेचा सामना करत असलेल्या पृथ्वी शॉचे डोळे उघडतील?
सचिन तेंडुलकरचा कडक संदेश; चाचपडत असलेल्या अन् टीकेचा सामना करत असलेल्या पृथ्वी शॉचे डोळे उघडतील?
लातूरमधील तळेगावच्या 300 एकर शेत जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा,  शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
लातूरमधील तळेगावच्या 300 एकर शेत जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा,  शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
तेव्हा एकत्र आर आर आबा आणि अनिल भाऊंची एन्ट्री अन् आता त्यांच्याच लेकरांची आमदार म्हणून एन्ट्री! नव्वदीचा योगायोग चर्चेत
तेव्हा एकत्र आर आर आबा आणि अनिल भाऊंची एन्ट्री अन् आता त्यांच्याच लेकरांची आमदार म्हणून एन्ट्री! नव्वदीचा योगायोग चर्चेत
ईव्हीएमविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक; पराभूत उमेदवाराच्या शहरातून निघेल पहिला 'मशाल मोर्चा'
ईव्हीएमविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक; पराभूत उमेदवाराच्या शहरातून निघेल पहिला 'मशाल मोर्चा'
Embed widget