VIDEO : मोहम्मद शमीच्या घटस्फोटीत पत्नीचा बेडरुममधील 'तो' भन्नाट डान्स पुन्हा व्हायरल, इन्स्टाग्राम दणाणून सोडलं
Mohammed Shami ex wife : मोहम्मद शमीच्या घटस्फोटीत पत्नीचा बेडरुममध्ये भन्नाट डान्स, इन्स्टाग्राम दणाणून सोडलं

Mohammad Shami Ex Wife Video Viral : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर त्याची पत्नी हसीन जहाँ हिने 2018 मध्ये घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर दोघांमध्ये मोठा वाद झाला आणि दोघांनी घटस्फोट घेतलाय. दरम्यान, महिन्याभरापूर्वी संपूर्ण देशभरात धुळवड उत्साहात साजरी करण्यात आली होती. यावेळी मोहम्मद शमीची पूर्वाश्रमीची पत्नी हसीन जहाँ भन्नाट डान्स करताना दिसली होती. तिचे फोटो इन्स्टाग्रामसह सर्व सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सवर तुफान व्हायरल झाले होते. दरम्यान, सध्या हसीन जहाँने 2024 साली शेअर केलेला एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय. हसीन जहाँचा जुना व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय. मात्र, काही लोकांनी या व्हिडीओवरुन तिला ट्रोल देखील केलं आहे.
View this post on Instagram
व्हायरल व्हिडीओमध्ये मोहम्मद शमीची पूर्वाश्रमीची पत्नी पांढऱ्या कलरच्या आऊटफिटमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या रॉय हिच्या Kajra Re या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हसीन जहाँ या गाण्यात डान्स करताना पहिल्यांदा एका खुर्चीवर बसते. त्यानंतर डान्स करत ती संपूर्ण बेडरुमध्ये फिरताना दिसत आहेत. हा व्हि़डीओ हसीन जहाँने 2024 मध्ये शेअर केला होता. नेटकऱ्यांमध्ये तो पुन्हा व्हायरल झालाय आणि चर्चेचा विषय बनतोय. काही लोकांनी तिच्या या व्हिडीओवर ट्रोल करणाऱ्या कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
लग्नाच्या चार वर्षांनंतर मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ झाले विभक्त
मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचे लग्न 2014 मध्ये झाले होते. लग्नाच्या अवघ्या चार वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला. त्याला एक मुलगी देखील आहे. कोलकाता न्यायालयाने शमीला जानेवारी 2023 पर्यंत हसीन जहाँला दरमहा १.३० लाख रुपये पोटगी म्हणून देण्याचे आदेश दिले होते. यामध्ये, त्याला त्याच्या विभक्त पत्नीच्या उदरनिर्वाहासठी 50,000 रुपये आणि मुलीच्या संगोपनासाठी 80,000 रुपये देण्याचे आदेश देण्यात आले होते.
View this post on Instagram
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या




















