एक्स्प्लोर
Priyansh Arya PBKS vs CSK IPL 2025: विराट कोहली, ख्रिस गेलही करु शकले नाही, ते प्रियांश आर्याने केले; युवा खेळाडूचा विश्वविक्रम
Priyansh Arya PBKS vs CSK IPL 2025: आयपीएल 2025 च्या 22 व्या सामन्यात पंजाब किंग्सने चेन्नईसमोर विजयासाठी 220 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
Priyansh Arya PBKS vs CSK IPL 2025
1/8

आयपीएल 2025 च्या हंगामात काल पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाबकडून खेळणाऱ्या प्रियांश आर्याने 103 धावांचा खेळी केली. (Image Credit-IPL)
2/8

युवा खेळाडू प्रियांश आर्याने इतिहास रचला आहे. त्याने आयपीएल 2025 मधील सर्वात जलद शतक ठोकले.(Image Credit-IPL)
3/8

प्रियांश आर्याने विराट कोहली आणि ख्रिस गेल यांनाही मागे टाकले आहे. (Image Credit-IPL)
4/8

प्रियांश आर्या हा टी-20 इतिहासात पहिला सलामीवीर ठरला आहे ज्याने टॉप 5 खेळाडू एकाच अंकी धावसंख्येवर बाद झाले असताना शतक ठोकले. त्यामुळे याबाबतीत प्रियांश आर्याने विराट कोहली आणि ख्रिस गेल यांनाही मागे टाकले आहे. (Image Credit-IPL)
5/8

आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याच्या बाबतीत प्रियांश आर्या चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने 39 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
6/8

आयपीएल 2025 च्या 22 व्या सामन्यात पंजाब किंग्सने चेन्नईसमोर विजयासाठी 220 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पंजाबकडून प्रियांशने एकतर्फी खेळी केली. 103 धावा करत प्रियांश आर्याने 9 षटकार आणि 7 चौकार टोलावले.(Image Credit-IPL)
7/8

आयपीएल सामन्यातील पहिल्याच चेंडूवर षट्कार मारणारा प्रियांश आर्या हा नमन ओझा, विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांच्यानंतरचा चौथा फलंदाज ठरला.(Image Credit-IPL)
8/8

आयपीएलमध्ये शतक ठोकणारा प्रियांश आर्या हा आठवा अनकॅप्ड (आंतरराष्ट्रीय स्तरावर न खेळलेला) खेळाडू ठरला.(Image Credit-IPL)
Published at : 09 Apr 2025 08:24 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















