एक्स्प्लोर

रोहित पवारांची पुण्यात मोठी घोषणा, देशांतर्गत क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडणार ही गोष्ट

Maharashtra Premier League 2023 : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (MCA) अध्यक्ष रोहित पवार यांनी पुण्यात आज मोठी घोषणा केली आहे.

Maharashtra Premier League 2023 : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (MCA) अध्यक्ष रोहित पवार यांनी पुण्यात आज मोठी घोषणा केली आहे. पुण्यातील गहुंजे मैदानात एमपीएलचा लिलाव पार पडला. यावेळी बोलताना रोहित पवार यांनी  पुढील वर्षी महिलांची MPL स्पर्धा आयोजित करणार असल्याची घोषणा केली. या स्पर्धेत चार संघांचा सहभाग असेल, असे त्यांनी सांगितले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रथमच कोणत्याही राज्य क्रिकेट संघटनेकडून महिला प्रिमियर लीगचे आयोजन करण्यात येणार आहे.   

एमपीएलसाठी मंगळवारी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात नौशाद शेख हा सर्वांत महागडा क्रिकेटपटू ठरला. लिलाव पार पडल्यानंतर रोहित पवार यांनी संवाद साधला. एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार म्हणाले, लिलावात खेळाडूंना मिळालेल्या बोलीवरून त्यांचा दर्जा अधोरेखित केला जाऊ नये. आमच्यासाठी प्रत्येक खेळाडू अमूल्य आहे. एमपीएलमुळे महाराष्ट्रातील उदयोन्मुख खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल. यामुळे भविष्यात आयपीएल आणि अन्य भारतीय संघांतून महाराष्ट्राचे अधिक खेळाडू खेळताना दिसतील असा विश्वास वाटतो. एमपीएलमधून मिळणारा निधी हा क्रिकेटच्या प्रोत्साहनासाठीच वापरला जाणार आहे. यामुळे एमसीएच्या कार्यकक्षेतील २१ जिल्ह्यांमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील, असेही रोहित पवार म्हणाले.

लिलावप्रक्रिया पार - 

लिलावासाठी ३०० हून अधिक खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये अ गटात रणजी करंडक खेळाडूंचा समावेश होता. त्यांची ६० हजार ही पायाभूत रक्कम निश्चित करण्यात आली होती. १९ वर्षांखालील आणि ब गटातील खेळाडूंसाठी ४० हजार रुपये किंमत ठरविण्यात आली होती. क गटासाठी २० हजार रुपये ही पायाभूत किंमत होती. खेळाडूंच्या खरेदीसाठी सहाही फ्रॅंचाईजींना २० लाख रुपयांची मर्यादा ठेवण्यात आली होती. फ्रॅंचाईजींना संघात १६ खेळाडूंचा समावेश करायचा होता. यामध्ये १९ वर्षांखालील दोन खेळाडू असणे अनिवार्य होते. १९ वर्षांखालील गटातून सचिन धस हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. कोल्हापूर संघाने सचिनसाठी १ लाख ५० हजाराची बोली लावली. 

एमपीएलमधील सहा संघ कोणते ?
सुहाना मसालेवालेंचा पुणे संघ पुणेरी बाप्पा नावाने ओळखला जाईल. ऋतुराज गायकवाड हा या संघाचा आयकॉन खेळाडू असेल. पुनित बाल समुहाचा संघ कोल्हापूर टस्कर्स, ईगल इन्फ्रा इंडियाचा संघ ईगल नाशिक टायटन्स, वेंकटेश्वरा इंडस्ट्रिजचा संघ छत्रपती संभाजी किंग्ज, जेटस सिंथेसिसचा संघ रत्नागिरी जेटस, कपिल सन्सचा संघ सोलापूर रॉयल्स अशा नावाने ओळखला जाईल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Embed widget