IPL Mega Auction LSG : टीम इंडियाकडून 3 सामने खेळलेल्या खेळाडूला लखनऊ देणार 14 कोटी, KL राहुलला मिळणार नारळ?
लखनऊ सुपर जायंट्स (LSG) नवीन हंगामात संघाचा कर्णधार केएल राहुलला नारळ देणार अशी चर्चा आहे.
IPL 2025 Auction LSG Update : इंडियन प्रीमियर लीग 2025 साठी बीसीसीआयचे रिटेन्शन पॉलिसी जारी केल्यानंतर सर्व 10 संघांनी त्यांच्या प्रमुख खेळाडूंची कायम ठेवण्याची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, केएल राहुल संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी संघ लखनऊ सुपर जायंट्स (LSG) नवीन हंगामात संघाचा कर्णधार केएल राहुलला नारळ देणार अशी चर्चा आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेगा लिलावापूर्वी संघाच्या कर्णधाराला सोडले जाऊ शकते. याआधी सामन्यादरम्यान संघ मालक आणि त्याच्यात झालेल्या वादाचे काही फोटो व्हायरल झाले होते. आता त्याला सोडल्याची बातमी समोर आली आहे. स्पोर्ट्स स्टारच्या बातमीनुसार, एलएसजी तीन खेळाडूंना कायम ठेवण्याचा विचार करत आहे. गेल्या मोसमात केएल राहुलच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडिजचा यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरनने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली होती. या खेळाडूला मोठ्या रकमेसह कायम केले जाईल. याशिवाय एलएसजीचा वेगवान गोलंदाज मयंक यादव आणि लेगस्पिनर रवी बिश्नोई यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मयंक यादवने नुकतेच बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेतून पदार्पण केले. वृत्तानुसार, 22 वर्षीय वेगवान गोलंदाज मयंक यादवला दुसऱ्या प्राधान्याच्या आधारावर कायम ठेवू शकते. यामुळे त्याला 14 कोटी रुपये मिळू शकतात. बीसीसीआयच्या नियमांनुसार दुसऱ्या क्रमांकावर कायम ठेवणाऱ्या खेळाडूला 14 कोटी रुपये दिले जातात. मयंक युवा आहे आणि त्याने आपल्या गोलंदाजीने खूप प्रभावित केले आहे. अशा परिस्थितीत एलएसजी केवळ त्याला कायम ठेवणार नाही. तर 14 कोटी रुपयांच्या मोठ्या रकमेत त्याला कायम ठेवणार आहे. 2023 मध्ये एलएसजीने या गोलंदाजाला 20 लाख रुपयांना खरेदी केले होते. सर्व आयपीएल फ्रँचायझी संघांना 31 ऑक्टोबरपर्यंत कायम ठेवण्यासाठी खेळाडूंची यादी सादर करायची आहे.
मयंक यादव 2024 मध्ये फक्त 4 सामने खेळू शकला होता. दुखापतीमुळे त्याला संपूर्ण मोसमात बाहेर बसावे लागले. पण अवघ्या 4 सामन्यांत त्याने आपल्या गोलंदाजीची छाप पाडली आणि 7 विकेट घेतल्या. पहिल्या दोन सामन्यात तो सामनावीर ठरला होता. त्याने 3 आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 4 विकेट घेतल्या आहेत.
हे ही वाचा -
Shreyas Iyer : श्रेयस अय्यरची दुखापत खरी की खोटी? दोन आंतरराष्ट्रीय खेळाडू बाहेर अन् गतविजेते अडचणीत