Kuldeep Yadav : कुलदीप यादवनं मार्करमला केलं बोल्ड आऊट, फॅन्सना आठवली बाबर आझमची विकेट, पाहा VIDEO
IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी कुलदीप यादवनं घेतलेली दक्षिण आफ्रिकेच्या मार्करची विकेट पाहण्याजोगी होती.
Kuldeep Yadav took Markram Wicket : भारतीय चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep yadav) बऱ्याच दिवसानंतर भारताकडून मैदानात उतरला होता. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या वन डेमध्ये 8 षटकात 39 धावा देत एक विकेटही घेतली. त्याने दक्षिण आफ्रिकेचा इनफॉर्म फलंदाज एडन मार्करम (Aiden Markram) यांना क्लीन बोल्ड केलं. त्याने ज्याप्रकारे अप्रतिम फिरकी गोलंदाजीवर मार्करमला बाद केलं, त्यावरुन फॅन्सना 2019 विश्वचषकाची आठवण झाली. त्यावेळीही कुलदीपना पाकिस्तानच्या बाबर आझमला अशाच शानदार चेंडूवर बोल्ड केलं होते.
कुलदीप यादवने दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडनला बाद केलेला चेंडू अतिशय अप्रतिम होता. भारतासाठी 16 वी ओव्हर कुलदीप यादव टाकत होता. त्यावेळी कुलदीपच्या हातातून चेंडू सुटला आणि आधी मार्करमच्या बॅट आणि पायाच्यामधून थेट स्टम्प्सकडे गेला आणि मार्करम क्लीन बोल्ड झाला. कुलदीपने घेतलेल्या विकेटचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत असून बीसीसीआयनंही आपल्या अधिकृत ट्वीटरवरुन हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
Absolute Beaut! 🙌 🙌@imkuldeep18 gets Aiden Markram out with a ripper! 👍 👍 #TeamIndia
— BCCI (@BCCI) October 6, 2022
Follow the match ▶️ https://t.co/d65WZUUDh2
Don’t miss the LIVE coverage of the #INDvSA match on @StarSportsIndia. pic.twitter.com/KMajjtsA67
सामना भारतानं 9 धावांनी गमावली
सामन्यात भारतीय संघानं (Team India) दमदार झुंज दिली, पण अखेर 9 धावा कमी पडल्याने भारताने सामना गमावला. यावेळी नाबाद 86 धावांची खेळी करत संजूनं एकहाती झुंज दिली, पण अखेर त्याची झुंज व्यर्थ ठरली. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी संघासाठी 40 षटकांचा केला होता. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 249 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यामुळे भारताला विजयासाठी 250 धावा करायच्या होत्या. पण भारत 40 षटकांत 240 धावाच करु शकला आणि भारताने सामना 9 धावांनी गमावला.
हे देखील वाचा-