IND vs NZ, 1st ODI, Pitch Report : हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर रंगणार आजची लढत, कशी असेल मैदानाची स्थिती?
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात होत असून हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर पहिला सामना खेळवला जात आहे.
India vs New Zealand ODI : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सलामीचा सामना आज खेळवला जात आहे. आजचा हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. तीन सामन्यांची ही एकदिवसीय मालिका असून पहिला सामना जिंकणार संघ 1-0 आघाडी घेईल ज्यामुळे पुढील सामन्यात अधिक चांगली कामगिरी करता येऊ शकते. त्यामुळे आजचा सामना तितकाच महत्त्वाचा असून या महत्त्वाच्या सामन्यात सामना होणाऱ्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी (Pitch Report) कशी आहे अर्थात पिच रिपोर्ट जाणून घेऊ...
हैदराबादमधील या मैदानाची खेळपट्टी सपाट विकेटसाठी ओळखली जाते. या मैदानावर खेळ सुरू असताना विकेट स्लो होते. म्हणजे वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकीपटूंना येथे अधिक मदत मिळेल. मात्र शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्याच्या आधारे येथील विकेट फलंदाजीसाठी देखील अनुकूल असल्याचं दिसून आलं आहे. सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सामन्यात देखील मोठी धावसंख्या झाली होती. येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या सहा एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना तीन जिंकले आहेत. तर तीन सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय झाला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होईल हे नक्की.
कसे आहेत दोन्ही संघ?
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार)वॉशिंगट सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराद, उमरान मलिक
न्यूझीलंड - फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकिपर/कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, जेकब डफी, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमन, हेन्री शिप्ले
भारत-न्यूझीलंड वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 18 जानेवारी | राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद |
दुसरा एकदिवसीय सामना | 21 जानेवारी | शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रायपूर |
तिसरा एकदिवसीय सामना | 24 जानेवारी | होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदोर |
हे देखील वाचा-