IND vs AUS : दिल्ली कसोटीपूर्वी जयदेव उनादकट संघाबाहेर, BCCI ने का केलं रिलीज?
Jaydev Unadkat IND vs AUS : बॉर्डर गावस्कर मालिकेतील दुसरा कसोटी सामना नवी दिल्लीच्या स्टेडिअमवर होणार आहे.
Jaydev Unadkat IND vs AUS : बॉर्डर गावस्कर मालिकेतील दुसरा कसोटी सामना नवी दिल्लीच्या स्टेडिअमवर होणार आहे. 17 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या या सामन्यापूर्वीच बीसीसीआयने वेगवान गोलंदाज जयदेव उनादकट याला रिलीज केलेय. नागपूर येथे झालेल्या पहिल्या कसोटीचाही उनादकट भाग नव्हता.. जयदेव सौराष्ट्राकडून रणजी चषकाचा फायनल सामना खेळणार आहे, त्यासाठी बीसीसीआयने त्याला रिलीज केलेय. आज झालेल्या उपांत्य सामन्यात सौराष्ट्राने कर्नाटकटा चार विकेट फराभव केला होता. सौराष्ट्र आणि बंगाल यांच्यामध्ये रणजी चषकाचा अंतिम सामना होणार आहे. त्या सामन्यासाठी जयदेव उनादकट याला बीसीसीआयने रिलीज केलेय. 16 फेब्रुवारीपासून कोलकाता येथील इडन गार्डनच्या मैदानावर सौराष्ट्र आणि बंगाल यांच्यात फायनलचा थरार रंगणार आहे. दरम्यान, 2010 मध्ये कसोटी पदार्पण केल्यानंतर, उनाडकट याला थेट 12 वर्षानंतर कसोटी संघात स्थान मिळालं होतं.
जयदेव उनादकट याला देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार प्रदर्शनानंतर टीम इंडियात संधी देण्यात आली होती. जयदेव उनादकट याने सौराष्ट्रासाठी दमदार कामगिरी केली होती. त्या कामगिरीच्या बळावरच जयदेव उनादकट याला टीम इंडियात स्थान मिळाले होते. पण नागपूर येथे झालेल्या कसोटी सामन्यात त्याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळालं नव्हतं. आता दुसऱ्या कसोटीतही जयदेव उनादकट खेळताना दिसणार नाही. टीम मॅनेजमेंटने त्याला रणजी ट्रॉफीच्या फायनलसाठी रिलीज केलेय. रणजीच्या फायनलचा थरार सौराष्ट्र आणि बंगाल यांच्यादरम्यान, कोलकातामधील ईडन गार्डन्सवर रंगणार आहे. 16 फेब्रुवारी रोजी रणजी फायनलाचा सामना होणार आहे.
NEWS - Jaydev Unadkat released from India’s squad for 2nd Test to take part in the finals of the Ranji Trophy.
— BCCI (@BCCI) February 12, 2023
More details here - https://t.co/pndC6zTeKC #TeamIndia pic.twitter.com/8yPcvi1PQl
सौराष्ट्रने रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात कर्नाटकचा चार गड्यांनी पराभव केला होता. या सामन्यात कर्नाटकचा कर्णधार मयांक अग्रवाल याने शतकी खेळी केली होती. कर्नाटक संघाने पहिल्या डावात 407 तर दुसऱ्या डावात 234 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल सौराष्ट्राने पहिल्या डावात 527 धावांचा डोंगर उभारला होता. तर दुसऱ्या डावात चार गडी राखून 117 धावा करत सामना जिंकला. आता फायनल सुरु होण्यापूर्वी सौराष्ट्राला खूशखबर मिळाली आहे. जयदेव उनादकट फायलनमध्ये खेळणार असल्याने सौराष्ट्राची ताकद नक्कीच वाढली असणार...
आणखी वाचा :
IND vs PAK, WT20: पाकिस्तानची प्रथम फलंदाजी, स्मृती मंधानाच्या अनुपस्थितीत कसा आहे भारतीय संघ?