Jasprit Bumrah : 'तीन फॉरमॅटमध्ये खेळणं अवघड....' जसप्रीत बुमराहचं इंग्लंड दौऱ्यापूर्वी मोठं वक्तव्य, कुटुंबाबाबत म्हणाला...
Jaspirt Bumrah : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं कोणत्या गोष्टींना कसं प्राधान्य द्यायचं हे समजलं पाहिजे, असं म्हटलं.

मुंबई : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं दीर्घ काळासाठी तीन फॉरमॅटमध्ये खेळणं अवघड होतं, पुढं जाऊन अधिक सिलेक्टिव्ह व्हावं लागेल, असंही तो म्हणाला. ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन मायकल क्लार्कच्या एका पॉडकास्टमध्ये जसप्रीत बुमराह बोलत होता.'नक्कीच, कोणत्याही खेळाडूसाठी प्रत्येक फॉरमॅटमध्ये खेळत राहणं सोपं नसतं, मी हे करत आहे. मात्र, तुम्हाला तुमचा फिटनेस आणि कोणत्या स्पर्धेत याची प्राथमिकता द्यायची हे समजून घेणं आवश्यक आहे, असं जसप्रीत बुमराह म्हणाला.
जसप्रीत बुमराहनं 45 कसोटी, 89 एकदिवसीय सामने आणि 70 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मुंबई इंडियन्ससाठी त्यानं 143 सामने खेळले आहेत. जसप्रीत बुमराहनं म्हटलं की तुम्हाला थोडं स्मार्ट व्हावं लागेल, तुमच्या शरीराचा उपयोग विचारपूर्वक आणि समजून घेऊन करावा लागेल. एक क्रिकेटर म्हणून मला काही सोडून द्यायचं नाही, नेहमी खेळत राहायचं आहे. मी सध्या फिट आहे, मात्र, इतके सामने खेळायचे आहेत, इतक्या विकेट घ्यायच्या आहेत, असं कोणतंही लक्ष्य ठेवलेलं नसल्याचं जसप्रीत बुमराह म्हणाला.
जसप्रीत बुमराहनं 2028 च्या लॉस एंजेलेस ऑलिम्पिकमध्ये भारताकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली. 1900 नंतर पहिल्यांदा 128 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार आहे.
जसप्रीत बुमराह इंग्लंड विरूद्धच्या भारताच्या कसोटी संघाच्या गोलंदाजीचं नेतृत्व करेल. तो म्हणाला की आम्ही आव्हान स्वीकारण्यास तयार आहे.इंग्लंडमध्ये खेळणं हे नेहमी आव्हान असतं. ड्यूक बॉलनं गोलंदाजी करणं आवडतं, असंही बुमराह म्हणाला. ऑस्ट्रेलियातील कोणतं शहर आवडतं या प्रश्नाचं उत्तर विचारलं असता जसप्रीत बुमराहनं अॅडलेड असं उत्तर दिलं. अॅशेस ट्रॉफी कोण जिंकणार असं विचारलं असता जसप्रीत बुमराहनं ऑस्ट्रेलिया जिंकू शकते, असा अंदाज वर्तवला. दोन वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर मुंबई इंडियन्समध्ये स्थान मिळाल्याची आठवण बुमराहनं सांगितलं.
कुटुंब महत्त्वाचं, कुटुंबाला प्राधान्य देणं महत्त्वाचं
जसप्रीत बुमराहनं करिअर पेक्षा कुटुंब महत्त्वाचं असल्याचं म्हटलं. क्रिकेटर पूर्णवेळ राहणार नाही, प्रथम मी माणूस आहे, असं जसप्रीत बुमराह म्हणाला. कुटुंब आणि माझा खेळ या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये कुटुंब अधिक महत्त्वाचं आहे. माझा मुलगा बॉल हातात घेऊन खेळत असतो पण त्यानं बॅट घेऊन षटकार मारावेत, असं जसप्रीत बुमराहनं म्हटलं. माझी पत्नी मुलाची काळजी घेते, असं जसप्रीत बुमराह म्हणाला. ग्राऊंडवर दिवस चांगला असतो किंवा वाईट असतो, मात्र तुमच्या कुटुंबाचं प्रेम कायम राहतं, असं जसप्रीत बुमराह म्हणाला.




















