IND vs PAK : पुन्हा एकदा मौका-मौका, भारत-पाकिस्तान आमने-सामने, रविवारी रंगणार महामुकाबला
Asia Cup 2022 : ग्रुप ए मधील पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग सामन्यात पाकिस्तानने 155 धावांनी विजय मिळवत सुपर 4 मध्ये जागा मिळवली आहे. ज्यामुळे आता भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत.

India vs Pakistan, Asia Cup 2022 : आशिया चषक स्पर्धेत (Asia Cup 2022) पाकिस्तानने हाँगकाँगला पराभूत करत सुपर 4 मध्ये एन्ट्री मिळवली आहे. ज्यामुळे आता पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) हा हायवोल्टेज सामना पार पडणार आहे. सुपर 4 चे सामने आता सुरु होणार असून रविवारी अर्थात 4 सप्टेबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे. याआधी ग्रुप स्टेजमधील सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 विकेट्सनी मात दिली असून आता पुन्हा एकदा दोघे आमने-सामने येणार आहेत.
भारत-पाकिस्तान सामना म्हटलं की सर्वच क्रिकेट चाहत्यांसाठी एक पर्वणी असते. दोन्ही संघामध्ये अगदी पूर्वीपासून अटीतटीचे सामने होताना दिसून आलं आहे. भारताकडे दिग्गज फलंदाजांची फौज असेल तर पाकिस्तानकजे वर्ल्ड-क्लास गोलंदाज. अशामध्ये चुरस आणि रोमहर्षक सामने होतच असतात. मागील काही सामन्यांत पाकिस्तानचं पारडं जड राहिलं असताना यंदाच्या आशिया कपच्या सलामीच्या सामन्यातच भारताने विजय मिळवला. आता मात्र सुपर 4 मधील सामन्यात कोणता संघ जिंकेल हे पाहणे औत्सुक्याचे राहिल.
पाकिस्ताननं हाँगकाँगला 155 धावांनी दिली मात
पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग सामन्यात सर्वात आधी हाँगकाँगने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. पाकिस्तानला कमी धावांत राखून निर्धारीत लक्ष गाठण्याचा त्यांचा डाव होता. पण पाकिस्तानच्या रिझवान आणि फखर जमान यांनी दमदार अर्धशतकं ठोकत अनुक्रमे 78 आणि 53 धावा ठोकल्या. खुशदील याने 35 धावा ठोकत फिनीशिंग टच दिला. ज्यामुळे पाकिस्तानने 20 षटकात 193 धावा केल्या. ज्यानंतर हाँगकाँगचा संघ फलंदाजीला आला असता पाकिस्तानच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत हाँगकाँगच्या एकाही फलंदाजाला साधी दुहेरी आकडेवारीही गाठू दिली नाही. त्यामुळे 10.4 षटकात हाँगकाँग 38 धावांवर सर्वबाद झाला. ज्यामुळे पाकिस्तान 155 धावांनी जिंकला.
आशिया चषक 2022 सुपर-4 चं वेळापत्रक
1) अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका- 3 सप्टेंबर 2022
2) भारत विरुद्ध पाकिस्तान 4 सप्टेंबर 2022
3) भारत विरुद्ध श्रीलंका- 6 सप्टेंबर 2022
4) अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान 7 सप्टेंबर 2022
5) भारत विरुद्ध अफगाणिस्तान- 8 सप्टेंबर 2022
6) श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान 9 सप्टेंबर 2022
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
