Aishwary Tomar Wins Gold: दक्षिण कोरियात भारताचा तिंरगा फडकला; नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत ऐश्वर्य तोमरनं सुवर्णपदक जिंकलं!
ISSF World Cup 2022: दक्षिण कोरियातील चांगवॉन येथे नेमबाजी विश्वचषक स्पर्धेतील 50 मीटर थ्री पोझिशन प्रकारात भारताच्या ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरनं (Aishwary Pratap Singh Tomar) सुवर्णपदक जिंकलंय
Changwon Shooting World Cup 2022: दक्षिण कोरियातील चांगवॉन येथे सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेतील 50 मीटर थ्री पोझिशन प्रकारात भारताच्या ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरनं (Aishwary Pratap Singh Tomar) सुवर्णपदक जिंकलंय. तोमरनं 2018 च्या युवा ऑलिम्पिक चॅम्पियन हंगेरीच्या जालान पेक्लार (Zalan Peklar) याचा 16-12 असा पराभव केला. नेमबाजी विश्वचषक स्पर्धेतील तोमरचं हे दुसरे सुवर्णपदक आहे, गेल्या वर्षी नवी दिल्ली येथे त्यानं पहिले सुवर्णपदक जिंकलं होतं.
ट्वीट-
नेमबाजी विश्वचषकात भारतानं आतापर्यंत 9 पदक जिंकले आहेत. यातील हे चौथे सुवर्णपदक आहे. तर, चार रौप्यपदक आणि एक कांस्यपदक जिंकलं आहे. पदकतालिकेत भारत अव्वल स्थानी आहे. यजमान दक्षिण कोरियानं आतापर्यंत चार पदक जिंकले आहेत. ज्यात तीन सुवर्ण आणि एक रौप्यपदक आहे. यापूर्वी अर्जुन बबुता, शाहू तुषार माने आणि पार्थ माखिजा यांनी कोरियाचा 17-15 असा पराभव करून 10 मीटर एअर रायफल सांघिक सुवर्णपदक जिंकलं, जे या विश्वचषकातील भारताचं तिसरं सुवर्णपदक होतं. भारतीय त्रिकुटानं कोरियाच्या स्युंगो बँग, सोंगडो किम आणि हेजुन पार्क यांचा पराभव केला होता.
2019 विश्वचषक चॅम्पियन मनू भाकेर महिलांच्या 25 मीटर पिस्तूल अंतिम फेरीत पराभव झाला. ज्यामुळं भारताचा सुवर्णपदक हुकलं. अंतिम सामन्यात नऊ सेट लावल्यानंतर ती स्पर्धेतून बाहेर झाली. 2018 मध्ये चांगवॉन विश्वचषक रौप्यपदक विजेती आणि अनुभवी अंजुम मुदगिल रविवारी महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेच्या पात्रता फेरीत सहाव्या स्थानावर राहून अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे.
हे देखील वाचा-