IND vs ENG: इंग्लंडमध्ये पाच भारतीय गोलंदाजांनी दाखवली जादू, ईशान शर्मा यादीत अव्वल
IND vs ENG: भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत इंग्लंडशी एकमेव कसोटी सामना खेळणार आहे.
![IND vs ENG: इंग्लंडमध्ये पाच भारतीय गोलंदाजांनी दाखवली जादू, ईशान शर्मा यादीत अव्वल Ishant Sharma has been the most successful Indian Test bowler in England, see the list of top-5 IND vs ENG: इंग्लंडमध्ये पाच भारतीय गोलंदाजांनी दाखवली जादू, ईशान शर्मा यादीत अव्वल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/28/eed1a0019c3d2eecd2fde99af9c78b71_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IND vs ENG: भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत इंग्लंडशी एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघ 2-1 नं आघाडीवर आहे. या मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना येत्या 1 जुलैपासून खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ इतिहास रचण्यासाठी सज्ज झालाय. इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळायला गेलेल्या भारताच्या पाच गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. या यादीत भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा अव्वल स्थानावर आहे.
ईशांत शर्मा
ईशांत शर्मा हा इंग्लंडविरुद्ध त्यांच्या मायदेशात सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज आहे. त्यानं इंग्लंडमध्ये 14 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात 48 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची गोलंदाजीची सरासरी 34 इतकी होती. त्यानं इंग्लंड दौऱ्यावर दोन वेळा पाच- पाच विकेट्स घेतल्या आहेत.
कपिल देव
भारताचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव येथे दुसऱ्या स्थानावर आहे. कपिल देव यांनी इंग्लंडसंघाविरुद्ध इंग्लंडमध्ये 43 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची गोलंदाजीची सरासरी 39.18 इतकी आहे.
अनिल कुंबळे
या यादीत तिसरे स्थान अनुभवी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेचं नाव आहे. इंग्लंड दौऱ्यावर त्यानं इंग्लंडविरुद्धच्या 10 कसोटी सामन्यांमध्ये 41.41 च्या गोलंदाजीच्या सरासरीनं 36 विकेट्स घेतल्या आहेत.
बिशनसिंह बेदी
भारताचा माजी फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदी हा इंग्लंडमध्ये भारताचा चौथा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्यानं इंग्लंडविरुद्धच्या 12 कसोटींमध्ये 38.08 च्या गोलंदाजीच्या सरासरीनं 35 विकेट्स घेतल्या आहेत. या यादीतील टॉप-5 मध्ये त्यांचा समावेश आहे. बेदीच्या नावावर इंग्लंडविरुद्ध 85 विकेटची नोंद आहे.
जसप्रीत बुमराह
टीम इंडियाच्या सध्याच्या संघात समाविष्ट असलेल्या जसप्रीत बुमराहचाही टॉप-5 मध्ये समावेश आहे. बुमराहनं इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच मायभूमीवर फक्त 7 कसोटी सामन्यांमध्ये 32 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहची गोलंदाजीची सरासरीही उत्कृष्ट आहे. त्यानं 23.06 च्या गोलंदाजीच्या सरासरीनं विकेट्स घेतल्या आहेत.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)