Arjun Tendulkar: जिनं विराटला प्रपोज केलं, आता त्याच महिला क्रिकेटरसोबत फिरतोय अर्जुन तेंडुलकर!
Arjun Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) आणि इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल व्हेट (Danielle Wyatt) यांची मैत्री खूप जूनी आहे.
![Arjun Tendulkar: जिनं विराटला प्रपोज केलं, आता त्याच महिला क्रिकेटरसोबत फिरतोय अर्जुन तेंडुलकर! IND vs ENG: Sachin Tendulkar’s son Arjun Tendulkar spotted having DINNER with England women’s team STAR Danielle Wyatt Arjun Tendulkar: जिनं विराटला प्रपोज केलं, आता त्याच महिला क्रिकेटरसोबत फिरतोय अर्जुन तेंडुलकर!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/28/ca0bc3a8d3c0f914a2e999a66a455257_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Arjun Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) आणि इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल व्हेट (Danielle Wyatt) यांची मैत्री खूप जूनी आहे. दोघांचे अनेकदा एकसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अर्जुन सध्या लंडनमध्ये आहे. तो डॅनियलसोबत लंडनमधील सोहो रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेला होता. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहेत. डॅनियल व्हेटनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर या लंचचा फोटो शेअर केलाय. विशेष म्हणजे, डॅनियलनं 2014 मध्ये विराट कोहलीला मध्यरात्री विराट कोहलीला (Virat Kohli) ट्विटरद्वारे प्रपोज केलं होतं.
सोशल मीडियावर खूप लोकप्रिय असलेल्या डॅनियल व्हेटनं एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करताना अर्जुनचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केलाय. या फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. त्यात अर्जुन लंच करताना दिसत आहे. व्हेट अर्जुनची खूप मोठी चाहती आहे. तिनं अनेकदा त्याच्या गोलंदाजीचं कौतूक केलं आहे. दिवसेंदिवस अर्जूनच्या गोलंदाजीवर खेळणं फलंदाजांसाठी अवघड जात आहे, असंही तिनं म्हटलं होतं.
डॅनियल व्हेटची कारकिर्द
व्हेटनं 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. डॅनियल व्हेटनं इंग्लंडकडून एकूण 93 एकदिवसीय आणि 124 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. व्हेटनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1 हजार 489 आणि टी-20 मध्ये 1 हजार 966 धावा केल्या आहेत.
अर्जून तेंडूलकर पदार्पणाच्या प्रतिक्षेत
अर्जून तेंडूलकर गेल्या दोन वर्षांपासून तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे, परंतु अद्याप त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही. 2021 च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्यानं मुंबईसाठी दोन सामने खेळले होते.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)