(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IRE vs IND: अख्ख्या भारतीय संघाशी एकटाच भिडलेला हॅरी टेक्टर आहे तरी कोण?
IRE vs IND: भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 28 जून रोजी डब्लिन येथे खेळवला जाणार आहे.
IRE vs IND: भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 28 जून रोजी डब्लिन येथे खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना सात विकेट्सनं जिंकून भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. अशा परिस्थितीत हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली भारताचा दुसरा टी-20 जिंकून आयर्लंडच्या संघाला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न असेल. भारताविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात आयर्लंड संघानं सात विकेट्सनं पराभव स्वीकारला. मात्र, आयर्लंडचा 22 वर्षीय फलंदाज हॅरी टेक्टरनं वादळी अर्धशतक ठोकून क्रिडाविश्वाचं लक्ष वेधून घेतलं.
भारताची मालिकेत 1-0 नं आघाडी
दरमन्या, पहिल्या टी-20 सामन्यात हॅरी टेक्टरच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर आयर्लंडच्या संघानं पहिल्या भारतासमोर 12 षटकात 109 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारतानं 16 चेंडू शिल्लक ठेवून सामना जिंकला. भारताकडून दिपक हुडानं 29 चेंडूत 47 धावांची खेळी केली. ज्यात दोन षटकार आणि सहा चौकारांचा समावेश आहे. त्याला इशान किशन (11 चेंडूत 26) आणि कर्णधार हार्दिक पंड्या (12 चेंडूत 24) यांची उत्तम साथ लाभली. आयर्लंडकडून क्रेग यंगनं दोन आणि जोश लिटलनं एक विकेट घेतली.
हॅरी टेक्टर कोण आहे?
हॅरी टेक्टरनं 2019 मध्ये नेदरलँडविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं आतापर्यंत 33 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात 604 धावा केल्या आहेत. ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानं भारताविरुद्ध पहिल्या टी-20 मध्ये 64 धावा फटकावत टी-20 कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ वैयक्तिक खेळी नोंदवली.
हॅरी टेक्टरचे शेवटचे चार टी20 डाव-
धावा | विरुद्ध संघ |
33 चेंडूत नाबाद 64 धावा | भारत |
37 चेंडूत 50 धावा | युएई |
27 चेंडूत 35 धावा | ओमान |
15 चेंडूत नाबाद 24 धावा | जर्मनी |
हे देखील वाचा-