एक्स्प्लोर

Test Cricket: कसोटीमध्ये 100 सामने गमावणारा बांगलादेश नववा संघ, इंग्लंड पहिला; भारताचा क्रमांक कितवा?

वेस्ट इंडीज आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना सेंट लूसिया येथे खेळण्यात आला. या सामन्यात वेस्ट इंडीजनं बांगलादेशला 10 विकेट्सनं पराभूत करत मालिका 2-0 नं जिंकली.

Test Cricket: वेस्ट इंडीज आणि बांगलादेश (West Indies vs Bangladesh) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना सेंट लूसिया येथे खेळण्यात आला. या सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघानं बांगलादेशला 10 विकेट्सनं पराभूत करत मालिका 2-0 नं जिंकली. या पराभवानंतर बांगलादेशच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झालीय. कसोटी क्रिकेटमध्ये 100 सामने गमावणारा बांगलादेश नववा संघ ठरलाय. 

भारताविरुद्ध  2000 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण 
भारताविरुद्ध  2000 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्‍या बांगलादेशनं आतापर्यंत एकूण 134 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना केवळ 16 सामने जिंकता आले आहेत, तर 100 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्या संघाने किती सामने गमावले आहेत? यावर एक नजर टाकुयात.

कसोटी क्रिकेटमध्ये 100 किंवा त्याहून अधिक सामने गमावणारे संघ- 

क्रमांक संघ पराभव
1 इंग्लंड  316
2 ऑस्ट्रेलिया 226
3 वेस्ट इंडीज 204
4 न्यूझीलंड 181
5 भारत 173
6 दक्षिण आफ्रिका 154
7 पाकिस्तान 135
8 श्रीलंका 115
9 बांगलादेश 100

वेस्ट इंडीजचा 10 विकेट्सनं विजय
या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा पहिला डाव 234 धावांत गुंडाळल्यानंतर वेस्ट इंडिजने 408 धावांची मजल मारली. यजमान पहिल्या डावात 174 धावांनी पुढे होते. बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात 186 धावांत गारद झाला. त्यानंतर फक्त 13 धावांचं लक्ष्य मिळालेल्या वेस्ट इंडीजच्या संघानं 10 विकेट्सनं हा सामना जिंकला. वेस्ट इंडीजच्या विजयात कायल मेयर्सनं मोलाचा वाटा उचलला. त्यानं वेस्ट इंडीजच्या पहिल्या डावात 146 धावांची खेळी केली. एवढेच नव्हे तर, या मालिकेत उत्कृष्ट प्रदर्शन केल्यामुळं त्याला मालिकावीर म्हणूनही सन्मानित करण्यात आलंय.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chandrakant Patil : राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धसांना शोभत नाहीत; चंद्रकांत पाटलांनी सुनावले खडेबोल
राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धसांना शोभत नाहीत; चंद्रकांत पाटलांनी सुनावले खडेबोल
Ind vs Aus 4th Test : नाकात दम केलेल्या 19 वर्षाच्या पोराला बुमराहने केलं क्लीन बोल्ड, भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
नाकात दम केलेल्या 19 वर्षाच्या पोराला बुमराहने केलं क्लीन बोल्ड, भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
Weather: पावसाचा इफेक्ट ओसरला, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान बदलणार, IMD चा काय इशारा? वाचा
पावसाचा इफेक्ट ओसरला, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान बदलणार, IMD चा काय इशारा? वाचा
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 AM : 29 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 29 डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 7.00 AM : 29 डिसेंबर 2024 : ABP MajhaKonkan Tourism Christmas New Year : पर्यावरण, पर्यटन, कोकण... कमावले 1 अब्ज 25 कोटी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrakant Patil : राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धसांना शोभत नाहीत; चंद्रकांत पाटलांनी सुनावले खडेबोल
राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धसांना शोभत नाहीत; चंद्रकांत पाटलांनी सुनावले खडेबोल
Ind vs Aus 4th Test : नाकात दम केलेल्या 19 वर्षाच्या पोराला बुमराहने केलं क्लीन बोल्ड, भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
नाकात दम केलेल्या 19 वर्षाच्या पोराला बुमराहने केलं क्लीन बोल्ड, भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
Weather: पावसाचा इफेक्ट ओसरला, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान बदलणार, IMD चा काय इशारा? वाचा
पावसाचा इफेक्ट ओसरला, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान बदलणार, IMD चा काय इशारा? वाचा
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा
महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा
16 तास वेटींग... मुंबई विमातळावर प्रवाशी दिवसभर ताटकळले; सकाळी 6.30 च्या विमानाचे रात्री 11 वाजता उड्डाण
16 तास वेटींग... मुंबई विमातळावर प्रवाशी दिवसभर ताटकळले; सकाळी 6.30 च्या विमानाचे रात्री 11 वाजता उड्डाण
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
धक्कादायक! घरात झोपलेल्या पती-पत्नीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न, घराच्या दारावर पेट्रोल ओतून लावली आग
धक्कादायक! घरात झोपलेल्या पती-पत्नीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न, घराच्या दारावर पेट्रोल ओतून लावली आग
Embed widget