Irfan Pathan slams Jasprit Bumrah : टीम इंडियाचा वाघ, बनतोय डोकेदुखी? जसप्रीत बुमराह 5 ओव्हर टाकून थांबतो, मग... इरफान पठाणची टीका, गंभीरच्या स्ट्रॅटेजीवर प्रश्नचिन्ह
England vs India Test Update : टीम इंडिया लॉर्ड्स कसोटीत 22 धावांनी पराभूत झाल्यानंतर 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत पुन्हा पिछाडीवर गेली आहे.

Irfan Pathan slams Jasprit Bumrah : टीम इंडिया लॉर्ड्स कसोटीत 22 धावांनी पराभूत झाल्यानंतर 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत पुन्हा पिछाडीवर गेली आहे. सध्या इंग्लंडने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या पराभवाचा परिणाम थेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025-27 च्या गुणतालिकेवरही झाला आहे. भारत एक स्थान घसरून चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर इंग्लंड तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
इरफान पठानची बुमराहवर टीका, स्टोक्सची स्तुती
लॉर्ड्स कसोटीत भारताच्या पराभवानंतर माजी अष्टपैलू खेळाडू आणि समालोचक इरफान पठानने जसप्रीत बुमराहच्या मर्यादित वापराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याच्या लढवय्या वृत्तीचे कौतुक करत त्याची स्तुती केली.
इरफान पठान आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हणाला की, "बेन स्टोक्सने लॉर्ड्स कसोटीच्या पाचव्या दिवशी सलग 9.2 षटक टाकली. तो फलंदाजी करतो, गोलंदाजी करतो आणि ऋषभ पंतसारख्या खेळाडूला रनआउटही करतो. पण इंग्लंडमध्ये त्याच्या वर्कलोडवर कुणीच बोलत नाही. भारतात मात्र लगेच वर्कलोडची चर्चा सुरू होते."
तो पुढे म्हटला की, "बेन स्टोक्सने गेल्या वर्षी अनेक शस्त्रक्रिया केल्या असूनही तो या मालिकेत सातत्याने गोलंदाजी करत आहे. त्याच्या तुलनेत बुमराहला लॉर्ड्समध्ये खूपच मर्यादित पद्धतीने वापरले गेले, जे निराशाजनक आहे."
वर्कलोड नाही, सामना जिंकणे महत्त्वाचे....
इरफान पठान पुढे म्हणाला की, "बुमराह पाच षटके टाकतो आणि मग जो रूट फलंदाजीला येईपर्यंत थांबतो. पण जर तुम्ही मैदानात असाल, तर वर्कलोडचा विचार करता कामा नये. सामना जिंकणं हाच तुमचा उद्देश असायला हवा. जसप्रीत बुमराहने लॉर्ड्समध्ये 7 विकेट घेतले, पण त्याचा उपयोग अधिक प्रभावीरीत्या करता आला असता."
जोफ्रा आर्चरचं जोरदार पुनरागमन
इरफान पठानने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या कामगिरीचंही भरभरून कौतुक केलं. तो म्हणाला की, "जोफ्रा आर्चर जवळपास चार वर्षांनी कसोटीत परतला, पण त्याने कसलीच भीती न बाळगता शानदार गोलंदाजी केली. त्याने सकाळी सहा षटके टाकली आणि नंतर परत येऊन पुन्हा गोलंदाजी केली. लॉर्ड्समध्ये त्याने एकूण पाच बळी घेतले आणि जवळपास 40 षटके टाकली."
इरफान पठानच्या मते, बेन स्टोक्सने कठीण परिस्थितीत झुंज देत लॉर्ड्समध्ये निर्णायक भूमिका बजावली. त्याने 'हिट-द-डेक' शैलीत गोलंदाजी करत इंग्लंडला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवलं. त्याचं हे समर्पण प्रेरणादायी आहे. जर तो सलग नऊ षटके टाकू शकतो, तर मग आपण मागे का राहायच? थोडक्यात, इरफान पठानने भारताच्या खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंटवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मैदानात उतरल्यावर "सामना जिंकणं" हाच सर्वोच्च उद्देश असायला हवा, असं ठामपणे सांगितलं आहे.





















