(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Irani Cup Shifted to Lucknow : महाराष्ट्रातील प्रकल्पानंतर आता क्रिकेटची महत्त्वाची स्पर्धाही राज्याबाहेर, 'या' कारणामुळे नाईलाजापोटी निर्णय
आजवर महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहेत. आता महाराष्ट्रातील प्रकल्पानंतर आता क्रिकेटची महत्त्वाची स्पर्धाही राज्याबाहेर जाणार आहे.
Irani Cup Shifted to Lucknow : आजवर महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहेत. आता महाराष्ट्रातील प्रकल्पानंतर आता क्रिकेटची महत्त्वाची स्पर्धाही राज्याबाहेर जाणार आहे. खरंतर, इराणी कप 2024/25 जो आधी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार होता, आता भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियम लखनऊ येथे खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईतून हलवण्याचे एक महत्त्वाचे कारण समोर आले आहे.
इराणी कप सामना 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान खेळवला जाणार आहे. त्याचे होस्टिंग अधिकृतपणे मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला देण्यात आले होते. पण बीसीसीआयने आता ते लखनौमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. मान्सूनचा प्रदीर्घ कालावधी हे त्याचे कारण आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सततच्या पावसामुळे मुंबईची परिस्थिती या सामन्याच्या आयोजनासाठी योग्य नाही. या कारणास्तव बीसीसीआयने लखनऊमधील एकना स्टेडियम हे नवीन ठिकाण म्हणून निवडले आहे.
इराणी कपमध्ये कोणते संघ खेळतात?
इराणी कपचा हा सामना रणजी ट्रॉफी 2023/24 चे विजेतेपद जिंकणारी मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात होणार आहे. यावेळी रणजीच्या अंतिम सामन्यात मुंबईने विदर्भाचा 169 धावांनी पराभव करत 42व्यांदा ट्रॉफी जिंकली होती. रेस्ट ऑफ इंडियाने इराणी कप स्पर्धेत 61 सामने खेळले आहेत आणि 30 वेळा जिंकले आहेत. त्याचबरोबर मुंबई संघाने 29 पैकी 14 सामने जिंकण्यात यश मिळवले आहे. यावेळी मुंबईला 15व्यांदा विजेतेपद मिळवून देण्याची जबाबदारी अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर असेल.
यावेळी भारतातील देशांतर्गत क्रिकेट हंगामाची सुरुवात दुलीप ट्रॉफी 2024 पासून झाली. स्पर्धेची पहिली फेरी संपली आहे. पहिल्या फेरीच्या पहिल्या सामन्यात भारत ब संघाने भारत अ विरुद्ध 76 धावांनी विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात भारत क संघाने भारत ड संघाचा 4 गडी राखून पराभव केला. दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत चांगली कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंना बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या संघातही स्थान मिळाले आहे.
हे ही वाचा -
Musheer Khan : अरे व्वा! तेंडुलकरचा विक्रम मोडणाऱ्या मुशीर खानसाठी खूशखबर; BCCI मोठा प्लान
Sanju Samson : टीम इंडियातून बाहेर असलेल्या संजू सॅमसनने उचललं मोठं पाऊल, बनला 'या' टीमचा मालक