IPL 2026 Auction : मिनी लिलावासाठी 1355 खेळाडूंकडून रजिस्ट्रेशन, ग्लेन मॅक्सवेलची माघार, 2 कोटींच्या बेस प्राईसमध्ये फक्त 2 भारतीय खेळाडू तर....
IPL 2026 Auction 1355 Players Registration Marthi News : येत्या 16 डिसेंबरला अबू धाबीमध्ये होणार असलेल्या ऑक्शनसाठी तब्बल 1355 खेळाडूंनी आपले नाव नोंदवले आहे.

IPL 2026 Auction Update : आयपीएल 2026 च्या मिनी ऑक्शनची धमाकेदार तयारी सुरू झाली आहे. येत्या 16 डिसेंबरला अबू धाबीमध्ये होणार असलेल्या ऑक्शनसाठी तब्बल 1355 खेळाडूंनी आपले नाव नोंदवले आहे. यामध्ये 2 कोटी रुपयांच्या सर्वाधिक बेस प्राइस कॅटेगरीत 45 खेळाडूंची निवड झाली असून, यामध्ये भारताकडून फक्त रवि बिश्नोई आणि वेंकटेश अय्यर ही जोडी आहे. फ्रँचायझींना आपली शॉर्टलिस्ट 5 डिसेंबरपर्यंत सादर करावी लागणार आहे. प्रत्येक टीमकडे जास्तीत जास्त 25 खेळाडूंची जागा उपलब्ध असल्याने, या वेळच्या ऑक्शनमध्ये 77 स्लॉट रिकामे राहणार आहेत, त्यापैकी 31 जागा परदेशी खेळाडूंसाठी आहेत.
कॅमरन ग्रीनवर सगळ्यांच्या नजरा...
ऑस्ट्रेलियाचा दमदार ऑलराऊंडर कॅमरन ग्रीन यंदाच्या ऑक्शनचा सर्वात हॉट टार्गेट असणार आहे. त्याचा बेस प्राइस 2 कोटी रुपये असून, तो गेल्या मेगा ऑक्शनला पाठीच्या दुखापतीमुळे उपस्थित राहू शकला नव्हता. यंदा केकेआर (64.3 कोटी) आणि CSK (43.4 कोटी) कडे सर्वाधिक पर्स शिल्लक असून, दोघांकडे परदेशी स्लॉट उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, आंद्रे रसेलच्या आयपीएल निवृत्तीनंतर केकेआर ग्रीनला त्याचा परफेक्ट रिप्लेसमेंट मानत आहे.
केकेआर आणि सीएसकेचे मोठे निर्णय, अनेक खेळाडू रिलीज
केकेआरने या वेळी 9 खेळाडूंना रिलीज केले आहे, ज्यात वेंकटेश अय्यरचाही समावेश आहे. त्याच्यासाठी केकेआरने मागील मेगा ऑक्शनमध्ये तब्बल 23.75 कोटी रुपये मोजले होते. आता टीमकडे 13 जागा रिकाम्या, त्यापैकी 6 परदेशी स्लॉट आहेत. सीएसकेनेही त्यांचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना याला दुखापतीमुळे रिलीज केलं आहे. गेल्या वर्षी त्याला 13 कोटींमध्ये रिटेन करण्यात आलं होतं. लियाम लिविंगस्टोन, वानिंदू हसरंगा, डेविड मिलर, नॉर्खिया, डॅरिल मिचेल अशा टॉप इंटरनॅशनल खेळाडूंनी देखील 2 कोटी बेस प्राइस ठेवल्याने ऑक्शन अधिक रंगणार आहे.
ग्लेन मॅक्सवेलची माघार
यंदा सर्वांना धक्का देत ग्लेन मॅक्सवेलचे नाव लिस्टमध्ये नाही. 2025 सीजनदरम्यान त्याला बोटाची दुखापत झाली होती आणि पंजाब किंग्सने त्याच्या जागी मिचेल ओवेनला घेतले होते. ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर जोश इंग्लिस हा ऑक्शनचा भाग असला, तरी तो फक्त 25% सीजनसाठी उपलब्ध असल्याने पीबीकेएसने त्याला रिलीज केले आहे.
16 डिसेंबर होणार लिलाव
2 कोटी बेस प्राइस कॅटेगरीत भारताकडून फक्त दोनच खेळाडू असल्याने, यंदाच्या ऑक्शनमध्ये परदेशी खेळाडूंवर अब्जोंची बोली लागणार हे नक्की. कोणती टीम कोणावर मोठा पैज लावणार, कोणाची लॉटरी लागणार… हे पाहण्यासाठी आयपीएल फॅन्स उत्सुकतेने प्रतीक्षा करत आहेत.
₹2 कोटींची मूळ किंमत असलेले खेळाडू :
रवी बिश्नोई, व्यंकटेश अय्यर, मुजीब उर रहमान, नवीन उल हक, शॉन ॲबॉट, ॲश्टन आगर, कूपर कॉनोली, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस, स्टीव्ह स्मिथ, मुस्तफिजुर रहमान, गुस बॅन ॲटकिन्सन, टोम बेन, टोमॅन, टोमॅन डकेट, डॅन लॉरेन्स, लियाम लिव्हिंगस्टोन, टायमल मिल्स, जेमी स्मिथ, फिन ॲलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी, मॅट हेन्री, काइल जेमिसन, ॲडम मिल्ने, डॅरिल मिशेल, विल ओ'रुर्के, रचिन रवींद्र, गेराल्ड कोएत्झी, एन डेव्हिड मिलर, एन डेव्हिड मिलर, एन रुरगी, एन. तबरेझ शम्सी, डेव्हिड विसे, वानिंदू हसरंगा, मथिशा पाथिराना, महेश थेक्षाना, जेसन होल्डर, शाई होप, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ.
हे ही वाचा -





















