Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या घरवापसीवर अखेर शिक्कामोर्तब; मुंबईने कोटींच्या घरात रोखीने बंडल मोजून मोहरा परत आणला
Hardik Pandya : गेल्या 24 तासांमध्येही बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. त्यामुळे हार्दिक सांगा कोणाचा? हे विचारायची वेळ आयपीएल चाहत्यांवर आली होती.
Hardik Pandya : गुजरातचा कॅप्टन हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये परतण्याव औपचारिकरित्या शिक्कामोर्तब झालं आहे. मुंबई इंडियन्सकडून आणि आयपीएलकडून अधिकृतरित्या घोषणा करण्यात आल्याने गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या चर्चाांनाही पूर्णविराम मिळाला आहे. गेल्या 24 तासांमध्येही बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. त्यामुळे हार्दिक सांगा कोणाचा? हे विचारायची वेळ आयपीएल चाहत्यांवर आली होती.
Rohit Sharma as captain.
— Johns. (@CricCrazyJohns) November 27, 2023
Kieron Pollard as batting coach.
Lasith Malinga as bowling coach.
Hardik Pandya returns.
Ishan, Surya, Tilak, Bumrah in the core.
- Mumbai Indians is ready to roar. pic.twitter.com/0WeU5MjlAp
मुंबई संघाच्या मालकीण नीता अंबानी हार्दिकच्या घरवापसीवर म्हणाल्या की, “आम्ही हार्दिकचे घरी स्वागत करताना आनंदी आहोत! आमच्या मुंबई इंडियन्स कुटुंबासोबत हा एक हृदयस्पर्शी पुनर्मिलन आहे! मुंबई इंडियन्सच्या तरुण प्रतिभावंत होण्यापासून ते आता टीम इंडियाचा स्टार बनण्यापर्यंत, हार्दिकने खूप पुढे मजल मारली आहे आणि त्याच्यासाठी आणि मुंबई इंडियन्ससाठी भविष्यात काय आहे याबद्दल आम्ही उत्सुक आहोत!”
📢 Announced!
— IndianPremierLeague (@IPL) November 27, 2023
𝗛𝗮𝗿𝗱𝗶𝗸 𝗣𝗮𝗻𝗱𝘆𝗮 ➡️ 𝗠𝘂𝗺𝗯𝗮𝗶 𝗜𝗻𝗱𝗶𝗮𝗻𝘀
𝗖𝗮𝗺𝗲𝗿𝗼𝗻 𝗚𝗿𝗲𝗲𝗻 ➡️ 𝗥𝗼𝘆𝗮𝗹 𝗖𝗵𝗮𝗹𝗹𝗲𝗻𝗴𝗲𝗿𝘀 𝗕𝗮𝗻𝗴𝗮𝗹𝗼𝗿𝗲#IPL pic.twitter.com/oyuAtP7Q27
हार्दिकच्या पुनरागमनाबद्दल बोलताना आकाश अंबानी म्हणाले की, “मुंबई इंडियन्समध्ये हार्दिकला परतताना पाहून मला खूप आनंद झाला. ही एक आनंदी घरवापसी आहे. तो खेळत असलेल्या कोणत्याही संघाला तो उत्तम संतुलन देतो. हार्दिकचा एमआय कुटुंबासोबतचा पहिला कार्यकाळ खूप यशस्वी होता आणि आम्हाला आशा आहे की तो त्याच्या दुसऱ्या कार्यकाळात आणखी यश मिळवेल.”
“Seeing Hardik back at Mumbai Indians makes me very happy. It is a happy homecoming. He provides great balance to any team he plays. Hardik’s first stint with the MI family was hugely successful, and we hope he achieves even more success in his second stint.”
— Mumbai Indians (@mipaltan) November 27, 2023
- Akash Ambani… pic.twitter.com/6cwBotunsb
हार्दिक पांड्याला रोख पैसे मोजून ट्रेड केलं आहे. त्यामुळे आगामी मोसमात पांड्या आता गुजरातसोबत दिसणार नाही. इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात मोठ्या बदल्यांपैकी एक म्हणून हा ट्रेड पाहिला जात आहे. रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्याची डील 15 कोटींमध्ये झाली आहे. भारताच्या प्रमुख अष्टपैलू या खेळाडूने 2015 ते 2021 दरम्यान आयपीएलमध्ये एमआयच्या चार विजयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.
“We are thrilled to welcome Hardik back home! It’s a heartwarming reunion with our Mumbai Indians family! From being a young scouted talent of Mumbai Indians to now being a team India star, Hardik has come a long way and we’re excited for what the future holds for him and Mumbai… pic.twitter.com/7UrqfjUEXU
— Mumbai Indians (@mipaltan) November 27, 2023
इतर महत्वाच्या बातम्या