IPL 2022: आयपीएल नको! 'या' स्टार खेळाडूंनी लिलावातून घेतली माघार
IPL Mega Auction 2022: आयपीएलमधील दहा संघांनी आपले खेळाडू रिटेन केले आहेत. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी आयपीएलचं मेगा ऑक्शन होणार आहे.
![IPL 2022: आयपीएल नको! 'या' स्टार खेळाडूंनी लिलावातून घेतली माघार IPL 2022: Joe Root, Ben Stokes, Chris Gayle among notable players to not register for mega auction IPL 2022: आयपीएल नको! 'या' स्टार खेळाडूंनी लिलावातून घेतली माघार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/12/161b6160f62e9a2e305092475664c283_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL Mega Auction 2022: आयपीएलमधील दहा संघांनी आपले खेळाडू रिटेन केले आहेत. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी आयपीएलचं मेगा ऑक्शन होणार आहे. आयपीएलच्या या हंगामात लखनौ आणि अहमदाबाद या दोन नवे संघाचा समावेश झाल्यानं मेगा ऑक्शन असणार आहे. आयपीएल 2022 मध्ये होणाऱ्या लिलावासाठी 1,214 खेळाडूंनी आपलं नाव नोंदवलं आहे. यामध्ये 896 भारतीय आणि 318 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. 1214 खेळाडूंमध्ये 270 खेळाडूंनी राष्ट्रीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय आणि 103 खेळाडू अनकॅप आहेत. तर, 41 खेळाडू कॅप खेळाडू आहेत. पण यंदाच्या आयपीएलमधून अनेक दिग्गज खेळाडूंनी आपलं नाव माघारी घेतलं आहे.
वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू ख्रिस गेल याने वय वाढल्यामुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. गेल्या हंगामात ख्रिस गेलने पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. यंदाच्या हंगामात गेल खेळताना दिसणार नाही. ESPNcricinfo च्या रिपोर्ट्सनुसार जो रुट, ख्रिस गेल, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, सॅम करन, मिचेल स्टार्क आणि ख्रिस वोक्स या स्टार खेळाडूंनी आयपीएलच्या लिलावातून आपलं नाव माघार घेतलं आहे.
कोणत्या देशातील किती खेळाडूंनी नोंदवलं नाव
ऑस्ट्रेलिया (59), दक्षिण आफ्रिका (48), वेस्ट इंडीज (41), श्रीलंका (36), इंग्लंड (30), न्यूझीलंड (29), अफगाणिस्तान (20), नेपाळ (15), अमेरिका (15), बांगलादेश (09), नामिबिया (05), आयर्लंड (03), ओमान (03), झिम्बाब्वे (02), भुटान (01), नेदरलँड्स (01), स्कॉटलँड (01) आणि यूएई (01)
तुमच्या आवडत्या फ्रेंचायझीनं कोणत्या खेळाडूंना केलं रिटेन?
मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमराह (12 कोटी), सुर्यकुमार यादव (8 कोटी), कायरन पोलार्ड (6 कोटी)
चेन्नई सुपर किंग्ज- महेंद्र सिंह धोनी (12 कोटी), रविंद्र जाडेजा (16 कोटी), मोईन अली (8 कोटी) आणि ऋतुराज गायकवाड (6 कोटी)
रॉयल चॅलेजर्स बंगळरू- विराट कोहली (15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल (11 कोटी) आणि मोहम्मद सिराज ( 7 कोटी)
दिल्ली कॅपिटल्स- रिषभ पंत (16 कोटी), अक्षर पटेल (9 कोटी), पृथ्वी शॉ (7.50 कोटी) अॅनरिच नॉर्टीजे (6.50 कोटी)
सनराईजर्स हैदराबाद- केन विल्यमसन (14 कोटी), अब्दुल समद (4 कोटी), उमरान मलिक (4 कोटी)
कोलकाता नाईट रायडर्स- आंद्रे रसल (12 कोटी), वरुण चक्रवर्ती (8 कोटी), व्यंकटेश अय्यर (8 कोटी) सुनील नारायण (6 कोटी)
पंजाब किंग्ज- मयांक अग्रवाल (12 कोटी), अशदीप सिंह (4 कोटी)
राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन (14 कोटी), जॉस बटलर (10 कोटी), यशस्वी जयस्वाल (4 कोटी)
लखनौ - केएल. राहुल (17 कोटी), मार्कस स्टॉयनिस(9.2 कोटी), रवि बिश्नोई (4 कोटी)
अहमदाबाद - हार्दिक पांड्या(15 कोटी), , राशिद खान(15 कोटी), शुबमन गिल (8 कोटी)
कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक राहिली आहे...(Purse remaining for 10 IPL teams:)
पंजाब PBKS - 72 Cr
हैदराबाद SRH - 68 Cr
राज्यस्थान RR - 62 Cr
लखनौ Lucknow - 58 cr
बंगळरू RCB - 57 Cr
अहमदाबाद Ahmedabad - 52 cr
मुंबई MI - 48 Cr
चेन्नई CSK - 48 Cr
कोलकाता KKR - 48 Cr
दिल्ली DC - 47.5 Cr
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)