Harbhajan Singh: हरभजन सिंहकडून 14 वर्षापूर्वी घडली एक चूक, आज होतोय पश्चाताप!
Harbhajan Singh: याप्रकरणी हरभजन सिंहवर आयपीएलच्या संपूर्ण हंगामासाठी बंदी घालण्यात आली. याव्यतिरिक्त त्याच्यावर पाच एकदिवसीय सामन्यांचीही बंदी घालण्यात आली.
Harbhajan Singh On Sreesanth: आयपीएलच्या पहिल्या हंगामात भारताचा फिरकीपटू हरभजन सिंह आणि वेगवान गोलंदाज श्रीसंतच्या कानशिलात लगावली होती. त्यानंतर क्रिडाविश्वात एकच खळबळ माजली. त्यावेळी हरभजन सिंह मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) तर, श्रीसंत पंजाब किंग्जच्या (Panjab Kings) संघाचा भाग होता. दरम्यान, 14 वर्षानंतर हरभजन सिंहनं या घटनेबद्दल खेद व्यक्त केलाय.
श्रीसंतच्या कानशिलात लगावल्याप्रकरणी हरभजन सिंहवर आयपीएलच्या संपूर्ण हंगामासाठी बंदी घालण्यात आली. याव्यतिरिक्त त्याच्यावर पाच एकदिवसीय सामन्यांचीही बंदी घालण्यात आली. हरभजन सिंहनं याआधीही अनेक वेळा आपली खंत व्यक्त केली आहे. श्रीसंतनं खूप नाटक केलं होतं. पण मी असं करणार नाही, ही माझी चूक होती. मी मैदानावर केलेलं कृत्य पूर्णपणे चुकीचं होतं. मी माझ्या चुकांमधून शिकलो आहे. मात्र, मी श्रीशांतच्या कानशिलात लगावली नव्हती. परंतु, चूक माझीच होती, असं हरभजन सिंहनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.
हरभजन सिंह काय म्हणाला?
"मला श्रीसंतसोबत अशा पद्धतीनं वागायला नको होतं. पण त्या दिवशी जे घडलं, ते खरंच चुकीचं होतं, असं म्हणत हरभजन सिंहनं आपली चूक मान्य केली. हरभजन सिंग पुढे म्हणाला की, खेळात भावना नेहमीच तुमच्यासोबत असतात. पण त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं. त्या दिवशी जे काही घडलं त्यात माझी चूक होती", असं हरभजन सिंह म्हणाला.
श्रीसंतची कारकिर्द
श्रीसंतनं 27 कसोटी सामन्यांव्यतिरिक्त भारतासाठी 53 एकदिवसीय आणि 10 टी-10 सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीशांतच्या नावावर 169 विकेट आहेत. विशेष म्हणजे 2007 मध्ये T20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा श्रीसंत भाग होता. याशिवाय 2011 मध्ये भारतीय संघानं 50 षटकांचा विश्वचषक जिंकला तेव्हाही श्रीसंत भारतीय संघाचा भाग होता. याशिवाय त्यानं आयपीएमध्ये 22 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 40 विकेट्स घेतल्या आहेत. पंजाब किंग्ज व्यतिरिक्त राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे.
व्हिडिओ-
हे देखील वाचा-
- Six Sixes In An Over: सहा चेंडूत सहा षटकार! 19 चेंडूत 84 धावा; पुदुच्चेरी टी-10 क्रिकेटमध्ये पांडेची वादळी खेळी
- Mitchell Marsh : दिल्लीच्या पराभवानंतर प्रथमच बोलला मिचेल मार्श, पाहा नेमकं काय म्हणाला?
- Order of the British Empire: चेन्नईच्या स्टार फलंदाजाला मिळाला 'ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर'चा पुरस्कार