एक्स्प्लोर

Sarfaraz Khan Marriage : मॅच पाहायला आलेल्या तरुणीच्या प्रेमात पडला IPL स्टार, सरफराज खाननं गुपचुप उरकलं लग्न

Sarfaraz Khan Marriage : आयपीएल (IPL) स्टार सरफराज खान मॅच पाहायला आलेल्या तरुणीच्या प्रेमात पडला. आता त्याने गुपचुप लग्न उरकलं आहे.

Sarfaraz Khan Marriage : मुंबईतील क्रिकेटपटू आणि आयपीएल (IPL) स्टार सरफराज खान (Sarfaraz Khan) लग्नबंधनात अडकला आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाकडून खेळणाऱ्या सरफराज खानने जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील तरुणीसोबत लग्नगाठ बांधली आहे. सरफराज मॅच पाहायला आलेल्या तरुणीच्या प्रेमात पडला आणि त्याने गुपचुप लग्न उरकलं आहे. सरफराज खाननं काश्मीरमधील रोमाना जहूर या तरुणीसोबत लग्न केलं आहे. काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील पशपोरा गावात हा लग्नसोहळा पार पडला. सरफराजच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

IPL स्टार सरफराज खान अडकला लग्नबंधनात

स्टार क्रिकेटर सरफराज खानने गाजावाजा न करता गुपचुप लग्न केलं आहे. आता सरफराज खान आणि पत्नी रोमाना यांचे सुंदर फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. निकाहच्या फोटोंमध्ये सरफराज, रोमाना आणि त्यांचे कुटुंबिय खूप आनंदी दिसत आहेत. या फोटोंमध्ये सरफराज काळ्या शेरवानीमध्ये तर रोमाना लाल आणि गोल्डन रंगाच्या लेहेंग्यामध्ये सुंदर दिसत आहे. या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे.

कशी झाली सरफराज खान आणि रोमानाची भेट

सरफराज खान आणि रोमाना यांची लव्हस्टोरीही इंटरेस्टिंग आहे. सरफराज खान मॅच पाहायला आलेल्या तरुणीच्या प्रेमात पडला. सरफराज खान आणि रोमाना जहून यांची पहिली भेट दिल्लीमध्ये झाली, तेव्हा रोमाना मॅच पाहण्यासाठी पोहोचली होती. त्यानंतर सरफराज आणि रोमाना यांची मैत्री झाली. यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. यानंतर सरफराजचे कुटुंबिय रोमानाच्या कुटुंबियांकडे लग्नाची बोलणी करण्यासाठी गेले आणि सर्वसंमत्तीने दोघांचं लग्न पार पडलं आहे.

पाहा सरफराज खानच्या लग्नातील व्हायरल व्हिडीओ :

सरफराज खान मुंबईतील स्टार क्रिकेटर

सरफराज खाननं इंडियान प्रीमियर लीगमध्ये चांगली खेळी केली आहे, तो मुंबईतील स्टार क्रिकेटर आहे. सध्या सरफराज खान आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतो. त्याआधी सरफराज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजा किंग्स संघाकडूनही खेळला आहे. सरफराज खानला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळालेली नाही. तो टीम इंडियाच्या अंडर-19 संघाचा भाग होता. 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians IPL 2026 : रोहित, सूर्या, पांड्या अन्.... आयपीएलच्या पहिल्या सामन्यात अशी असणार मुंबई इंडियन्सची तगडी Playing 11
रोहित, सूर्या, पांड्या अन्.... आयपीएलच्या पहिल्या सामन्यात अशी असणार मुंबई इंडियन्सची तगडी Playing 11
Gautam Gambhir on MS Dhoni VIDEO : MS धोनी टीम इंडियाचा कोच व्हावा, गौतम गंभीरची इच्छा; म्हणाला, मला 'माही'ला डगआऊटमध्ये बसलेला...
MS धोनी टीम इंडियाचा कोच व्हावा, गौतम गंभीरची इच्छा; म्हणाला, मला 'माही'ला डगआऊटमध्ये बसलेला...
IPL 2026 News : संजू ऑरेंज कॅप, बुमराह पर्पल कॅप..., प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या 4 टीमही सांगितल्या; IPL 2026 च्या आधी आकाश चोप्राची भविष्यवाणी
संजू ऑरेंज कॅप, बुमराह पर्पल कॅप..., प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या 4 टीमही सांगितल्या; IPL 2026 च्या आधी आकाश चोप्राची भविष्यवाणी
Gautam Gambhir News : ड्रेसिंग रूममध्ये रोहित-विराटशी खटके का उडाले? गौतम गंभीरची कबुली, म्हणाला, माझ्याकडूनही चुका झाल्या...
ड्रेसिंग रूममध्ये रोहित-विराटशी खटके का उडाले? गौतम गंभीरची कबुली, म्हणाला, माझ्याकडूनही चुका झाल्या...

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Update: राज्यावर अवकाळीचे सावट, गुढीपाडव्याला पावसाची हजेरी, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यावर अवकाळीचे सावट, गुढीपाडव्याला पावसाची हजेरी, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट
Pune Crime News: शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
Mira Bhayander Hospital News: आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील हादरवणारी घटना
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Embed widget