एक्स्प्लोर

VIDEO : विश्वचषक उंचावण्यासाठी टीम इंडिया अहमदाबादमध्ये दाखल, चाहत्यांची गर्दी

Ahmedabad : उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघाने फायनलचे तिकीट मिळवले.

Indian Cricket Teams Reached Ahmedabad : उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघाने फायनलचे तिकीट मिळवले. 19 नोव्हेंबर, रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलचा सामना रंगणार आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना खेळण्यासाठी आज टीम इंडिया न्यूझीलंडमध्ये दाखल झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ विश्वचषकात आतापर्यंत अजेय आहे. आणखी एका विजयासाठी टीम इंडिया अहमदाबादमध्ये पोहचली आहे. भारतीय संघ अहमदाबादमध्ये दाखल होताच, चाहत्यांची गर्दी जमली आहे. 

भारतीय संघ अहमबादामध्ये दाखल झाल्यानंतरचा व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये चाहत्यांची मोठी गर्दी दिसत आहे. टीम इंडियाला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली आहे. तर दुसऱ्या बाजूने टीम बस येताना दिसत आहे. टीम बस पाहून चाहत्यांमध्ये एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळाला. व्हिडीओमध्ये चाहत्यांमधील उत्साह  पष्टपणे दिसत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याच्या इराद्याने अहमदाबादला पोहोचली आहे. आतापर्यंत 2011 आणि 1983 मध्ये भारताने चषकावर नाव कोरलेय. तर 2023 मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. आता 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा टीम इंडियाला  एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी उंचावताना पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. भारतीय संघाने शेवटचा एकदिवसीय विश्वचषक 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. 

पाहा व्हायरल व्हिडीओ---

दरम्यान, फायनलचा महामुकाबला 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी पीएम मोदी स्वत: उपस्थित राहणार आहेत. दैनिक जागरणने याबाबत वृत्त दिलं आहे. 

न्यूझीलंडला पराभवाचा धक्का देत भारताने गाठली फायनल - 

वानखेडेवर न्यूझीलंडचा पराभव करत टीम इंडियाने चौथ्यांदा वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली.  यंदाच्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव केला. भारताने आतापर्यंत दोन वेळा एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे.  चाहत्यांना तिसऱ्या विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. वानखेडेवर भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. यामध्ये विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने शतके झळकावली. मोहम्मद शमीने 7 विकेट घेतल्या. भारतायी संघ तिसऱ्या विश्वचषक उंचवणार का? याकडे जगभरातील चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Embed widget