Indian Cricket Team Head Coach: भारतीय क्रिकेट संघाचा पुढील प्रशिक्षक कोण असावा...?; पाकिस्तानच्या वसीम आक्रमने खुल्या मनानं नाव सांगितलं!
Indian Cricket Team Head Coach: राहुल द्रविड यांचा कार्यकाळ जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2024 नंतर संपणार आहे. याबाबत आता नवीन अपडेट्स समोर येत आहे.
Indian Cricket Team Head Coach: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वरिष्ठ पुरुष भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. सध्या राहुल द्रविड (Rahul Dravid) भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहे. द्रविड यांचा कार्यकाळ जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2024 नंतर संपणार आहे. याबाबत आता नवीन अपडेट्स समोर येत आहे.
2 जूनपासून T-20 विश्वचषक सुरू होत आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या भूमीवर ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्याचबरोबर टी-20 विश्वचषकानंतर राहुल द्रविडचा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. मात्र, आता राहुल द्रविडनंतर कोणाला प्रशिक्षक बनवणार हा प्रश्न आहे. यासाठी अनेक दावेदारांची नावे पुढे येत आहेत. या स्पर्धकांमध्ये भारतासह जागतिक क्रिकेटमधील मोठ्या नावांचा देखईल समावेश आहे. याचदरम्यान पाकिस्तान संघाचा माजी खेळाडू वसीम आक्रमने भारतीय क्रिकेट संघाचा पुढील मुख्य प्रशिक्षक कोण असावा, याबाबत भाष्य केलं आहे.
वासिम आक्रम काय म्हणाला? (Wasim Akram on Team India Next Coach)
वासिम आक्रमने सध्या कोलकाता संघाकडून मेंटरची भूमिका निभावणाऱ्या गौतम गंभीरचं नाव सुचवलं आहे. गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक झाल्यास खूप चांगले होईल. गौतम गंभीरमध्ये प्रशिक्षक होण्याची क्षमता आहे. गंभीरने नुकतेच राजकारण सोडले आहे. पण गंभीरने निर्णय घ्यावा, त्याला काय वाटतं, असं वासिम आक्रमने सांगितले. तसेच मुख्य प्रशिक्षकपदासाठी आशिष नेहरा आणि लक्ष्मण देखील योग्य व्यक्ती असल्याचं वासिम आक्रम म्हणाला.
बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही पात्रता आणि अटी निश्चित केल्या आहेत आणि त्या पुढीलप्रमाणे आहेत-
- किमान 30 कसोटी किंवा 50 एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव असावा.
- किमान दोन वर्षे पूर्ण सदस्य चाचणी खेळणाऱ्या देशाचे मुख्य प्रशिक्षक असले पाहिजेत.
- किमान 3 वर्षे आयपीएल संघ किंवा त्याच्या समकक्ष आंतरराष्ट्रीय लीग किंवा प्रथम श्रेणी संघ किंवा राष्ट्रीय अ संघाचे सहयोगी सदस्य किंवा मुख्य प्रशिक्षक असणे आवश्यक आहे.
- वय 60 वर्षांपेक्षा कमी असावे.
संबंधित बातम्या:
आयपीएलमधील यशस्वी प्रशिक्षक घेणार राहुल द्रविडची जागा; बीसीसीआय करतेय चतुर दिग्गजाचा विचार