एक्स्प्लोर

आलिशान घर, ऑडी, बीएमडब्ल्यू, 5 किलो चांदी...; टीम इंडियाचा प्रशिक्षक झालेल्या गौतम गंभीरची संपत्ती किती?

Indian Cricket Team Head Coach Gautam Gambhir: बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी गौतम गंभीरकडे दिली आहे.

Indian Cricket Team Head Coach Gautam Gambhir: टी-20 विश्वचषकानंतर राहुल द्रविडने (Rahul Dravid) भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडले. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची (Indian Cricket Team Head Coach) जबाबदारी गौतम गंभीरकडे (Gautam Gambhir) दिली आहे. गौतम गंभीरने याआधी आयपीएलमध्ये कॉमेंट्री आणि मेंटॉरशिप करून खूप कमाई केली आहे. याशिवाय त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. 

गौतम गंभीरची संपत्ती किती?

गौतम गंभीर हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक मानला जातो. त्याची एकूण संपत्ती 265 कोटी रुपये आहे. तो केवळ क्रिकेटमधूनच नव्हे तर ब्रँड प्रायोजकत्व आणि अनेक व्यवसायांमध्ये गुंतवणूक करून भरपूर कमाई करतो. छोटे व्यवसाय, रेस्टॉरंट आणि रिअल इस्टेटमध्येही त्यांची गुंतवणूक आहे. स्टार स्पोर्ट्ससाठी कॉमेंट्री आणि इतर क्रिकेट मीडियाशी संबंधित काम करून गंभीरने 1.5 कोटी रुपये कमावल्याचा अंदाज आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गंभीर पूर्व दिल्लीतून खासदार म्हणून निवडून आले होते . त्यावेळी गंभीरने निवडणूक आयोगासमोर आपले वार्षिक उत्पन्न 12.4 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते.

दिल्लीत 15 कोटी रुपयांचे घर-

गौतम गंभीरचे दिल्लीतील राजिंदर नगर भागात एक आलिशान घर आहे, ज्याची किंमत अंदाजे 15 कोटी रुपये आहे. याशिवाय त्याच्याकडे ग्रेटर नोएडा येथील जेपी विश टाऊनमध्ये 4 कोटी रुपयांचा प्लॉट आहे. मलकापूर गावात एक कोटी रुपयांचा प्लॉटही आहे. याशिवाय गंभीरकडे 5 किलो चांदी आहे.

आयपीएलमधून 25 कोटींची कमाई-

गौतम गंभीरने शेवटचा सामना 2018 मध्ये आयपीएलमध्ये खेळला होता, जेव्हा त्याला एक हंगाम खेळण्यासाठी 2.8 कोटी रुपये मिळाले होते. पण आयपीएल 2024 मध्ये तो कोलकाता नाईट रायडर्समध्ये मार्गदर्शक म्हणून सामील झाला. गंभीरने आयपीएल 2024 मध्ये मार्गदर्शक म्हणून काम करण्यासाठी 25 कोटी रुपये घेतले होते. गंभीरने एकही सामना न खेळता आयपीएलमधील खेळाडूंपेक्षा जास्त कमाई केली आहे.

गौतम गंभीरचे कार कलेक्शन-

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरलाही कारची आवड आहे. लक्झरी वाहनांबद्दल बोलायचे झाले तर त्याच्याकडे ऑडी Q5 आणि BMW 530d देखील आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये टोयोटा कोरोला आणि महिंद्रा बोलेरो स्टिंगर देखील आहेत. असे म्हटले जाते की त्याच्याकडे मर्सिडीज GLS 350D देखील आहे, ज्याची बाजारातील किंमत जवळपास 88 लाख रुपये आहे.

संबंधित बातम्या:

Gautam GambhirL गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक होताच 5 खेळाडूंचं नशीब चमकणार?; टीम इंडियात आता स्थान पटकवण्याची शक्यता

Gautam Gambhir : कामरान अकमलवर धावून गेला, भल्या भल्यांना भिडला, वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांनो गौतम गंभीरपासून दोन हात लांबच राहा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
Vipul Kadam: श्रीकांत शिंदेंचा मेहुणा भास्कर जाधवांना भिडणार, वर्षावरची खलबतं संपताच विपुल कदम कामाला लागले
बातमी फुटताच श्रीकांत शिंदेंचा मेहुणा कामाला लागला, गुहागर विधानसभेची उमेदवारी पक्की?
नाशिकमध्ये शिंदे गटाने 7 मतदारसंघ हेरले, लोकसभेची चूक पुन्हा नाही, हेमंत गोडसेंचं मोक्याच्या क्षणी पुनवर्सन?
नाशिकमध्ये शिंदे गटाने 7 मतदारसंघ हेरले, लोकसभेची चूक पुन्हा नाही, हेमंत गोडसेंचं मोक्याच्या क्षणी पुनवर्सन?
One Nation One Election : केंद्र सरकार 3 विधेयक आणून नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच मोठा निर्णय घेणार? नेमका प्लॅन आहे तरी काय??
केंद्र सरकार 3 विधेयक आणून नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच मोठा निर्णय घेणार? नेमका प्लॅन आहे तरी काय??
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPhaltan : सोळशीच्या कार्यक्रमात अजित पवारांनी फोनवरून केली उमेगवारीची घोषणाGovernment Employees :सेवानिवृत्ती उपदान 14 लाखांवरून  20 लाख करणार?Narhari Zirwal : धनगर समाज आदिवासीत येत नाही; सरकारने जबाबदारी स्वीकारावी - नरहरी झिरवाळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
Vipul Kadam: श्रीकांत शिंदेंचा मेहुणा भास्कर जाधवांना भिडणार, वर्षावरची खलबतं संपताच विपुल कदम कामाला लागले
बातमी फुटताच श्रीकांत शिंदेंचा मेहुणा कामाला लागला, गुहागर विधानसभेची उमेदवारी पक्की?
नाशिकमध्ये शिंदे गटाने 7 मतदारसंघ हेरले, लोकसभेची चूक पुन्हा नाही, हेमंत गोडसेंचं मोक्याच्या क्षणी पुनवर्सन?
नाशिकमध्ये शिंदे गटाने 7 मतदारसंघ हेरले, लोकसभेची चूक पुन्हा नाही, हेमंत गोडसेंचं मोक्याच्या क्षणी पुनवर्सन?
One Nation One Election : केंद्र सरकार 3 विधेयक आणून नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच मोठा निर्णय घेणार? नेमका प्लॅन आहे तरी काय??
केंद्र सरकार 3 विधेयक आणून नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच मोठा निर्णय घेणार? नेमका प्लॅन आहे तरी काय??
Ramdas Athawale : महायुतीचं जागावाटपासाठी बैठकांचं सत्र, रामदास आठवलेंनी आरपीआयचा दोन अंकी आकडा सांगितला, भाजपकडे यादी सोपवली
महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटण्यापूर्वीच रामदास आठवलेंनी बावनकुळेंकडे यादी सोपवली, बच्चू कडूंना म्हणाले...
Ajit Pawar : अजित पवारांची स्मार्ट खेळी,फोनवरुन दीपक चव्हाणांची उमेदवारी जाहीर, रामराजे खुदकन हसले, कारण...
अजित पवारांची स्मार्ट खेळी, भरसभेत फोनवरुन दीपक चव्हाणांना उमेदवारी, रामराजेंचा मूड बदलला
Sanjay Raut :शिंदे गटाचा दसरा मेळावा सुरत किंवा गुवाहाटीत व्हायला हवा, संजय राऊतांची बोचरी टीका
शिंदे गटाचा दसरा मेळावा सुरत किंवा गुवाहाटीत व्हायला हवा, संजय राऊतांची बोचरी टीका
Mammootty Net Worth: 'साऊथचे अंबानी' म्हणून ओळखले जातात 'मामूटी'; 100 कोटींच्या फक्त कार, इतर संपत्तीची बातच और... टोटल नेटवर्थ किती?
'साऊथचे अंबानी' सिनेस्टार 'मामूटी'; 100 कोटींच्या फक्त कार, इतर संपत्तीची बातच और... टोटल नेटवर्थ किती?
Embed widget