(Source: ECI/ABP News/ABP Majha)
FICA President : भारतात जन्मलेल्या लिसा स्थळेकरकडे मोठी जबाबदारी; फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेट असोसिएशनची पहिली महिला अध्यक्ष
Lisa Sthalekar FICA President : लिसा स्थळेकर भारतात जन्मलेली असली तरी तिने ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळात कमाल कामगिरी केलेली आह. आठ टेस्ट आणि 125 वन डे सामन्यांत तिने 4000 हून अधिक धावा केल्या आहेत.
Lisa Sthalekar FICA President : ऑस्ट्रेलियाची माजी महान क्रिकेटर लिसा स्थळेकरकडे (Lisa Sthalekar) मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कार्यकारी समितीच्या बैठकीत तिच्याकडे फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशनचं (federation of international cricket associations) अध्यक्षपद सोपवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ही जबाबदारी मिळणारी ती पहिली महिला आहे.
लिसा स्थळेकर ही भारतात जन्मलेली असून तिच्या आई वडिलांनी आर्थिक अडचणीमुळे तिला पुण्याच्या एका अनाथ आश्रमात सोडलं होतं. ज्याठिकाणाहून स्थळेकर नावाच्या परदेशी दाम्पत्याने तिला दत्तक घेतलं. पुढे जाऊन लिसा ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळू लागली. तिने आठ कसोटी सामने आणि 125 एकदिवसीय सामने खेळत यामध्ये 4 हजार धावा केल्या आहेत. इतक्या आंतरराष्ट्रीय धावा करणारी 42 वर्षीय लिसा आता फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशनची (FICA) अध्यक्ष बनली आहे. लिसाला ही जबाबदारी देण्यात आलेली कार्यकारी समितीची बैठक एफआयसीए आणि वर्ल्ड प्लेअर्स असोसिएशन प्लेअर डेव्हलपमेंट काँफ्रेन्सच्या आझी आयोजित करण्यात आली होती. कोरोना महामारीनंतर ही पहिलीच व्यक्तीगत बैठक होती.
इतकी मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर लिसा म्हणाली,"मी एफआयसीएची नवी अध्यक्ष झाल्यानंतर मी खूप सन्मानित आणि उत्साहीतही आहे. मी या खेळाच्या एका नव्या जबाबदारीत प्रवेश करत आहे. आता क्रिकेटही मोठ्या प्रमाणात वाढत असून अनेक नवनवे देश यात सहभागी होत आहेत. ज्यामुळे क्रिकेट आता एक जागतिक खेळ झाल्याचं स्पष्ट झालं आहे.''
हे देखील वाचा-
- Hardik Pandya on England Tour : आयर्लंड दौऱ्यानंतर इंग्लंडविरुद्ध टी20 मालिकेतही हार्दिक कर्णधार?, समोर आली मोठी अपडेट
- IPL सामन्यात फेकलेल्या एका बॉलमधून बीसीसीआयला मिळणार 49 लाख; एका सामन्यातून होणार 118 कोटींचा फायदा
- T20 Cricket Records : आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत 7 वेळा स्कोरबोर्डवर 250+ धावसंख्या; अफगानिस्तानच्या नावावर सर्वात मोठी टोटल