IND vs ENG : आयर्लंड दौऱ्यानंतर इंग्लंडविरुद्ध टी20 मालिकेतही हार्दिक कर्णधार?, समोर आली मोठी अपडेट
India vs England : आयर्लंड दौऱ्यानंतर लगेचच भारतीय संघाचे इंग्लंड विरुद्धचे सामने सुरु होणार आहेत. यावेळी कसोटी सामन्यासह एकदिवसीय आणि टी20 सामनेही खेळवले जाणार आहेत.
![IND vs ENG : आयर्लंड दौऱ्यानंतर इंग्लंडविरुद्ध टी20 मालिकेतही हार्दिक कर्णधार?, समोर आली मोठी अपडेट Hardik Pandya may be team India Captain for england T20 series IND vs ENG : आयर्लंड दौऱ्यानंतर इंग्लंडविरुद्ध टी20 मालिकेतही हार्दिक कर्णधार?, समोर आली मोठी अपडेट](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/7/2018/02/07113255/Hardik-Pandya-16.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India vs England T20 Series : भारतीय क्रिकेट संघातील (Team India) एक ग्रुप सध्या इंग्लंडमध्ये (India tour of england) असून कसोटी सामन्यासह एकदिवसीय आणि टी20 सामन्यांचा सराव करत आहे. तर दुसरा ग्रुप लवकरच आयर्लंडविरुद्ध दोन टी20 सामने 26 आणि 28 जून रोजी खेळणार आहे. दरम्यान या सामन्यांसाठी कर्णधार म्हणून नियुक्त हार्दिकच इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेतही कर्णधार असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या (TOI) एका रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे.
TOI च्या रिपोर्टनुसार, आयरर्लंड दौऱ्यासाठी खेळणारा टी20 संघच इंग्लंड विरुद्धच्या तीन टी20 सामन्यांसाठी जाहीर केला जाऊ शकतो. दरम्यान असे झाल्यास हार्दिकलाच कर्णधारपद मिळणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकमेव कसोटी सामना हा 1 ते 5 जुलै दरम्यान होणार असून नंतर लगेचच 7 जुलै रोजी 3 टी20 सामन्यांना सुरुवात होईल. त्यामुळे कसोटी संघातील रोहित, विराट, बुमराह यासारख्या दिग्गज खेळाडूंना लगेचच टी20 सामने खेळणे अवघड असल्याने आयर्लंडविरुद्धचाच संघ हे सामने खेळणार आहे. याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.
इंग्लंड विरुद्ध भारत टी-20 मालिका वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 7 जुलै | एजेस बाउल |
दुसरा टी-20 सामना | 9 जुलै | एजबॅस्टन |
तिसरा टी-20 सामना | 10 जुलै | ट्रेंट ब्रिज |
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)