Smriti Mandhana: वेस्ट इंडिजविरुद्ध स्मृती मानधनाची दमदार खेळी, महिला विश्वचषकात झळकावले दुसरे शतक
Smriti Mandhana: वेस्ट इंडिजविरुद्ध मोठी धावसंख्या गाठण्यासाठी भारताच्या संघाला एका मोठ्या डावाची गरज होती.
![Smriti Mandhana: वेस्ट इंडिजविरुद्ध स्मृती मानधनाची दमदार खेळी, महिला विश्वचषकात झळकावले दुसरे शतक India vs West Indies Live Score, Women's World Cup 2022: Smriti Mandhana century Smriti Mandhana: वेस्ट इंडिजविरुद्ध स्मृती मानधनाची दमदार खेळी, महिला विश्वचषकात झळकावले दुसरे शतक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/12/6ffd0d1ec567826402f348cb666213d3_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Smriti Mandhana: वेस्ट इंडीजविरुद्ध हॅमिल्टनच्या सेडन पार्कवर सुरू असलेल्या सामन्यात भारताची सलामीवीर स्मृती मानधनानं शतक झळकावलं आहे. डावखुरा फलंदाज स्मृती मानधनाने 108 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केलंय. स्मृती मानधानाचे महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे दुसरं शतक आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध मोठी धावसंख्या गाठण्यासाठी भारताच्या संघाला एका मोठ्या डावाची गरज होती. स्मृती मानधनाचं शतक अत्यंत निर्णायक वेळी आलंय.
स्मृती मानधनानं वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरे शतक ठोकून एकदिवसीय कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावलं आहे. तिनं ही पाच शतके विदेशी मैदानावर झळकावली आहेत आणि अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. या कामगिरीसह स्मृती मानधनानं भारताची कर्णधार मिताली राजचा घराबाहेर सर्वाधिक 4 शतकांचा भारतीय विक्रम मोडला आहे.
संघ-
भारताचा संघ-
यास्तिका भाटिया, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, ऋचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, झुलन गोस्वामी, मेघना सिंह, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, तानिया भाटिया, रेणुका सिंग, शफा वर्मा सिंह.
वेस्ट इंडीजचा संघ-
डिआंड्रा डॉटिन, हेली मॅथ्यूज, किसिया नाइट, स्टॅफनी टेलर (कर्णधार), शेमाइन कॅम्पबेले (विकेटकिपर), चेडियन नेशन, चिनेल हेन्री, आलिया अॅलीने, शमिलिया कोनेल, अनीसा मोहम्मद, शकेरा सेलमनबेंचअफी फ्लेचर, करिश्मा रामहारक, रशादा विल्यम्स, राशदा फ्रेचर.
हे देखील वाचा-
- ICC World Cup, IND vs WI : भारतीय महिला वेस्ट इंडीजविरुद्ध सामन्यासाठी सज्ज, कधी, कुठे पाहाल सामना?
- IPL 2022 : कर्णधार ऋषभ पंतला मोठा धक्का, स्टार प्लेअर सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार
- IPL 2022 : 13 मार्चला गुजरात टायटन्सचा नवा लूक येणार समोर, हार्दीकची पलटन नव्या जर्सीसाठी सज्ज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)