(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs SL 1st ODI : T20 नंतर आता वनडे सीरिजची उत्सुकता; सामना कधी आणि कुठे पाहाल? वाचा सविस्तर
IND vs SL ODI Live Streaming : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे सीरिज 10 जानेवारीपासून सुरू होत आहे.
IND vs SL ODI Live Streaming : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची T20 सीरिज (IND vs SL) संपली आहे आणि आता दोन्ही संघांनी वनडे सीरिजची तयारी सुरू केली आहे. या सीरिजमधील पहिला सामना 10 जानेवारी रोजी गुवाहाटी येथील बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. पाच दिवसांत तीन सामने खेळले जातील. तिन्ही सामने दिवसरात्र होणार आहेत.
टी-20 सीरिजच्या (T-20 Series) तुलनेत वनडे सीरिजसाठी टीम इंडियाचा संघ खूप बदललेला दिसत आहे. या सीरिजमध्ये सीनियर खेळाडूंचे पुनरागमन होत आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल श्रीलंकेविरुद्धच्या वनडेमध्ये आघाडी सांभाळताना दिसतील. या सीरिजमधून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीचे वनडे संघात पुनरागमन होत आहे. दुसरीकडे, श्रीलंकेच्या संघात फारसा बदल झालेला दिसला नाही.
भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिका पूर्ण वेळापत्रक
पहिला वनडे : 10 जानेवारी, दुपारी 1.30 PM (बालासपारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी)
दुसरा वनडे : 12 जानेवारी, दुपारी 1.30 PM (ईडन गार्डन्स, कोलकाता)
तिसरा वनडे : 15 जानेवारी, 1.30 PM स्टेडियम आंतरराष्ट्रीय (ग्रेन) स्टेडियम, तिरुवनंतपुरम)
थेट सामने कुठे पाहता येतील?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या सीरिजमधील सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपित केले जातील. या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग Disney + Hotstar अॅपवर उपलब्ध असेल.
दोन्ही संघांमध्ये 'या' खेळाडूंचा समावेश
टीम इंडिया (India Team) : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.
श्रीलंका (Sri Lanka Team) : दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस, चारिथ अस्लंका, आशान बंडारा, वानिंदू हसरंगा, अविष्का फर्नांडो, नुवानिंदू फर्नांडो, चमिका करुणारत्ने, लाहिरू कुमरा, दिलशान मदुशंका, पथुम निसांका, प्रमोद मदुशान, सामुना राजविरा, कासून, महाराणी, महाराणी, नुवानिंदू फर्नांडो, जेफ्री वँडरसे, ड्युनिथ वेलाल्गे.
महत्त्वाच्या बातम्या :
Suryakumar Yadav: तीन देश, 3 शतकं अन् विक्रमांची मालिका... सूर्या नावाचं वादळ फॉर्मात