एक्स्प्लोर

IND vs SL : पहिल्या वनडे मॅचबाबत मोठी अपडेट, अधिकाऱ्यांच्या एका चुकीनं सुपरओव्हर झालीच नाही? नियम काय सांगतो?

IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली मॅच टाय झाली होती. सुपर ओव्हरमद्वारे मॅचचा निकाल लावला जाईल अशी अनेकांना आशा होती. 

कोलंबो: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. तीन पैकी दोन मॅच पार पडलेल्या आहेत. पहिली मॅच टाय झाली तर दुसऱ्या मॅचमध्ये श्रीलंकेनं भारताचा 32 धावांनी पराभव केला आहे. यामुळं श्रीलंकेनं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या मॅचमध्ये श्रीलंकेनं 8 विकेटवर 230  धावा केल्या होत्या. यानंतर भारतीय संघ 230 धावांवर बाद झाला होता. त्यामुळं अनेकांना मॅचचा निकाल सुपर ओव्हरद्वारे (India vs Sri Lanka 1st ODI Super Over Rule) लावला जाईल, असं वाटलं होतं. मात्र, सुपर ओव्हर खेळवण्यात आली नाही. मॅच टाय झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी सुपर ओव्हर देखील का खेळवण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता सुपर ओव्हर संदर्भातील नियमाकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा दावा करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळं पहिल्या मॅचमध्ये सुपर ओव्हर झाली नाही, असं देखील बोललं जातंय.  

दैनिक जागरणमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार श्रीलंकेच्या एका अधिकाऱ्याच्या नाव छापण्याच्या अटीवर माहिती देण्यात आली आहे. डिसेंबर2023 मधील एकदिवसीय सामन्यांच्या नियमांनुसार सुपर ओव्हरचा पर्याय उपलब्ध होता. याशिवाय दोन्ही बोर्डांनी केलेल्या करारात देखील सुपर ओव्हरचा उल्लेख होता.  

सुपर ओव्हरच्या नियमाकडे दुर्लक्ष

डिसेंबर 2023 मध्ये पुरुष क्रिकेटमधील एकदिवसीय सामन्यांबाबतच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला होता. 16.3.1.1 नुसार जेव्हा एकदिवसीय सामना टाय होईल तेव्हा सुपर ओव्हर घेतली जावी, असा नियम आहे. जोपर्यंत मॅचचा निकाल लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर घेण्यात यावी असं म्हटलंय. मात्र. भारत आणि श्रीलंका यांच्यातील मॅचमध्ये सुपर ओव्हरच्या नियमांकडे दुर्लक्ष  करण्यात आलं. आयसीसीच्या नियमांचं पालन करण्याची जबाबदारी आयसीसी अधिकारी, मॅच रेफरी आणि पंचांची असते, असा दावा करण्यात आला आहे.  

'द मॉर्निंग टेलिग्राफ' मधील एका रिपोर्टनुसार आयसीसीच्या अधिकाऱ्यानं या वनडे मालिकेत पुन्हा एखादी  मॅच टाय झाल्यास सुपर ओव्हर खेळवली जाईल, असं म्हटलं.  

पहिली वनडे टाय, दुसऱ्या मॅचमध्ये भारताचा पराभव

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिली मॅच टाय झाली. दुसऱ्या मॅचमध्ये भारताला 32  धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. श्रीलंकेनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 9 बाद 240 धावा केल्या होत्या. तर, भारतीय संघ 42.2 ओव्हरमध्ये 208 धावांवर बाद झाला.  

दरम्यान, भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरी वनडे मॅच 7 ऑगस्टला होणार आहे. भारताला मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी विजयाची आवश्यकता आहे. 

संबंधित बातम्या : 

Ind vs SL: श्रीलंकेविरुद्ध टीम इंडिया का ढेपाळली...?; जाणून घ्या, पराभवामागील 5 महत्वाची कारणं

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही देशाला, भारतमातेला, आईला विकलं लाज वाटत नाही का? लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार; एपस्टीवरून मोदींवर आरोप, रिजिजू म्हणाले, पुरावे द्या, आताच देतो म्हणताच अध्यक्ष म्हणाले, मी मागितले नाहीत!
तुम्ही देशाला, भारतमातेला, आईला विकलं लाज वाटत नाही का? लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार; एपस्टीवरून मोदींवर आरोप, रिजिजू म्हणाले, पुरावे द्या, आताच देतो म्हणताच अध्यक्ष म्हणाले, मी मागितले नाहीत!
मुंबई महापालिकेत पहिल्या दिवशी राडा, खाली बसावं लागल्याने संताप; ठाकरेंचे नगरसवेक आक्रमक, म्हणाले, बॉडी लँग्वेज विक्षिप्त
मुंबई महापालिकेत पहिल्या दिवशी राडा, खाली बसावं लागल्याने संताप; ठाकरेंचे नगरसवेक आक्रमक, म्हणाले, बॉडी लँग्वेज विक्षिप्त
जमीन महसूल कायद्यात मोठा बदल, आता जमिनीसाठी एन.ए. परवानगीची गरज नाही, जमीन मालकांना दिलासा
जमीन महसूल कायद्यात मोठा बदल, आता जमिनीसाठी एन.ए. परवानगीची गरज नाही, जमीन मालकांना दिलासा
राम सातपुतेंच्या हत्येचा कट? उत्तम जानकरांचा पलटवार, म्हणाले, मुर्दाड माणसाला कोण मारणार? प्रसंगही सांगितला
राम सातपुतेंच्या हत्येचा कट? उत्तम जानकरांचा पलटवार, म्हणाले, मुर्दाड माणसाला कोण मारणार? प्रसंगही सांगितला

व्हिडीओ

Sanjay Raut : भाजपसोबत न जाण्याचा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या, चंद्रपूरमधील घडामोडींवर टीका
Ritu Tawade Mumbai Mayor : रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौरपदी विराजमान
Ravindra Chavhan Nanded : भाजप प्रवेशाच्या अफवेवरून काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण संतापले..
Adnan Sami VS Congress And Sanjay Raut : संजय राऊतांचा वार, अदनानचा पलटवार Special Report
Govinda Politics : राजकारण पुरे झालं असं गोविंदा का म्हणाला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुम्ही देशाला, भारतमातेला, आईला विकलं लाज वाटत नाही का? लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार; एपस्टीवरून मोदींवर आरोप, रिजिजू म्हणाले, पुरावे द्या, आताच देतो म्हणताच अध्यक्ष म्हणाले, मी मागितले नाहीत!
तुम्ही देशाला, भारतमातेला, आईला विकलं लाज वाटत नाही का? लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार; एपस्टीवरून मोदींवर आरोप, रिजिजू म्हणाले, पुरावे द्या, आताच देतो म्हणताच अध्यक्ष म्हणाले, मी मागितले नाहीत!
मुंबई महापालिकेत पहिल्या दिवशी राडा, खाली बसावं लागल्याने संताप; ठाकरेंचे नगरसवेक आक्रमक, म्हणाले, बॉडी लँग्वेज विक्षिप्त
मुंबई महापालिकेत पहिल्या दिवशी राडा, खाली बसावं लागल्याने संताप; ठाकरेंचे नगरसवेक आक्रमक, म्हणाले, बॉडी लँग्वेज विक्षिप्त
जमीन महसूल कायद्यात मोठा बदल, आता जमिनीसाठी एन.ए. परवानगीची गरज नाही, जमीन मालकांना दिलासा
जमीन महसूल कायद्यात मोठा बदल, आता जमिनीसाठी एन.ए. परवानगीची गरज नाही, जमीन मालकांना दिलासा
राम सातपुतेंच्या हत्येचा कट? उत्तम जानकरांचा पलटवार, म्हणाले, मुर्दाड माणसाला कोण मारणार? प्रसंगही सांगितला
राम सातपुतेंच्या हत्येचा कट? उत्तम जानकरांचा पलटवार, म्हणाले, मुर्दाड माणसाला कोण मारणार? प्रसंगही सांगितला
Shahid Afridi: 'भारताला चार गुजराती चालवत आहेत, दोन विकत आहेत, दोन विकत घेताहेत', शाहीद आफ्रिदीची स्फोटक टीका, काय-काय बोलला?
Video: 'भारताला चार गुजराती चालवत आहेत, दोन विकत आहेत, दोन विकत घेताहेत', शाहीद आफ्रिदीची स्फोटक टीका, काय-काय बोलला?
Dharashiv ZP Election: जिल्हा परिषदत निवडणुकीत वेगळी चूल; निकालनंतर महायुती तानाजी सावंतांना वगळून सत्ता स्थापन करणार? अध्यक्षपदावरूनही रस्सीखेच
जिल्हा परिषदत निवडणुकीत वेगळी चूल; निकालनंतर महायुती तानाजी सावंतांना वगळून सत्ता स्थापन करणार? अध्यक्षपदावरूनही रस्सीखेच
Sunetra Pawar Meets PM Modi: प्रफुल पटेलांच्या निवासस्थानी 'ब्रेकफास्ट पे चर्चा'; सुनेत्रा पवारांनी घेतली पीएम मोदींची भेट, पार्थ पवारांची खासदारकी निश्चित?
प्रफुल पटेलांच्या निवासस्थानी 'ब्रेकफास्ट पे चर्चा'; सुनेत्रा पवारांनी घेतली पीएम मोदींची भेट, पार्थ पवारांची खासदारकी निश्चित?
Pune Crime Budhwar Peth: पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री 12 वाजता पोलिसांचा प्रचंड फौजफाटा पोहोचला, कुंटणखान्यातील खोल्यांची झडती, नेमकं काय घडलं?
पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री 12 वाजता पोलिसांचा प्रचंड फौजफाटा पोहोचला, कुंटणखान्यातील खोल्यांची झडती, नेमकं काय घडलं?
Embed widget