![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Hardik Pandya And Natasa Stankovic : हार्दिक पांड्याला पत्नी नताशाचा व्हिडीओ कॉल? टीम इंडियाच्या विजायानंतरचा 'तो' प्रसंग व्हायरल
भारताने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत टी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. या सामन्यात हार्दिक पांड्याने मोलाची कामगिरी केली.
![Hardik Pandya And Natasa Stankovic : हार्दिक पांड्याला पत्नी नताशाचा व्हिडीओ कॉल? टीम इंडियाच्या विजायानंतरचा 'तो' प्रसंग व्हायरल india Vs South Africa T20 World cup Final ind vs sa did hardik pandya video call to wife natasa stankovic photo went viral on social media Hardik Pandya And Natasa Stankovic : हार्दिक पांड्याला पत्नी नताशाचा व्हिडीओ कॉल? टीम इंडियाच्या विजायानंतरचा 'तो' प्रसंग व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/5fd9135aadeb3874f95157f9441871ef1719726192121988_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India Vs South Africa T-20 World Cup Final : भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. या सामन्यात भारताचा स्फोटक फंलदाज विराट कोहली, वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह, अक्षर पटेल आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यांनी मोलाची कामगिरी केली. यांच्या योगदानामुळेच भारताला विजयाला गवसणी घालता आली. दरम्यान, या विजयानंतर भारताच्या प्रत्येक खेळाडूने आपापल्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा केला. अनेक खेळाडूंनी आपली पत्नी तसेच कुटुंबीयांना आनंदाने मिठी मारली. विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मला व्हिडीओ कॉल करत आपला आनंद साजरा केला. याच उत्साहादरम्यान, सध्या हार्दिक पांड्याचा एक फोटो सगळीकडे व्हायरल होत आहे. या फोटोला पाहून हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकचा (Natasa Stankovic) व्हिडीओ कॉल आला, असा नेटकरी तसेच पांड्याचे चाहते दावा करत आहेत.
नताशा-हार्दिकमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा
गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्यात सर्वकाही आलबेल नाही, असा दावा केला जातोय. नताशाने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर काही स्टोरीज शेअर केल्या होत्या. त्या पोस्टचा आधार घेत या दोघांच्या नात्यातील धुसफुसीचा अंदाज लावला जात होता. विशेष म्हणजे यावेळच्या आयपीएल पर्वात हार्दिक पांड्या मैदानात असताना एकाही सामन्यात नताशा स्टेडियममध्ये दिसली नाही. या कारणामुळेही दोघांच्या नात्याच्या अफवेला हवा मिळाली होती.
स्टेडियममध्ये नेमकं काय घडलं?
सामन्यात टीम इंडियाचा विजय झाल्यानंतर प्रत्येकजण आपल्या स्वकियांना फोन कॉल, व्हिडीओ कॉल करून आपला आनंद साजरा करत होते. याच काळात हार्दिक पंड्यालाही एक व्हिडीओ कॉल आला. या व्हिडीओ कॉलमध्ये तो कोणाशीतरी बोलत असल्याचे दिसतेय. खाली मैदानावर बसून तो हा संवाद करतोय. या व्हिडीओ कॉलचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच फोटोंचा आधार घेत नताशा आणि पांड्या यांच्यात व्हिडीओ कॉल चालू होता, असा दावा केला जातोय. खरं म्हणजे हार्दिक नेमकं कोणाशी बोलत होता, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. पण या निमित्ताने दोघांच्या नात्यात कसलीही नाराजी नाही, असे म्हणत पांड्याच्या चाहत्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
View this post on Instagram
विराटचा अनुष्काला व्हिडीओ कॉल
टीम इंडियाच्या विजयानंतर विराट कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सामना संपताच त्याने हा निर्णय सार्वजनिक केला आहे. दरम्यान, विजयानंतर त्याने आपली पत्नी अनुष्का शर्माला व्हिडीओ कॉल केला. अनुष्का आणि विराट यांच्यातील या संभाषणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. विराटसोबतच टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानेही आपला आनंद त्याची पत्नी रितिका सजदेहला आनंदाने मिठी मारली. या आनंददायी क्षणाचेही फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)