IND vs SA Playing 11: दीपक चाहर, अर्शदीप सिंहचं पुनरागमन; पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन
IND vs SA Playing 11: भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात आज पहिला टी-20 सामना खेळला जाणार आहे. तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम हा सामना पार पडणार आहे.
IND vs SA Playing 11: भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात आज पहिला टी-20 सामना खेळला जाणार आहे. तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम हा सामना पार पडणार आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघात दोन आक्रमक गोलंदाजांचं पुनरागमन झालंय. वेगवान गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) आणि अर्शदीप सिंहला (Arshdeep Singh) प्लेईंग इलेव्हनमध्ये निवड करण्यात आलीय. हार्दिक आणि भुवनेश्वरला विश्रांती देण्यात आली आहे. आर अश्विन युजवेंद्र सिंहची जागा घेणार आहे. महत्वाचं भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला सकाळी किरकोळ दुखापत झाल्यानं तो या सामन्यात खेळणार नाही.
कधी, कुठं पाहणार सामना?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज (28 सप्टेंबर) पहिला टी-20 सामना खेळला जाणार आहे. तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम हा सामना खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सामना सुरु होईल. त्याआधी अर्धातासपूर्वी नाणेफेक होईल. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
भारत-दक्षिण आफ्रिका टी-20 हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि दक्षिण आफ्रिका(India vs South Africa T20 Record) यांच्यात आतापंर्यंत 20 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी 11 सामन्यात भारतीय संघानं विजय मिळवलाय. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आठ सामन्यात विजय मिळवता आलाय. यातील एक सामना अनिर्णित ठरलाय.
संघ-
भारताची प्लेइंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, दीपक चहर, अर्शदीप सिंह.
दक्षिण आफ्रिकेची प्लेईंग इलेव्हन:
क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रिली रॉसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, कागिसो रबाडा, केशव महाराज, अॅनरिक नॉर्टजे, तबरेझ शाम्सी.
हे देखील वाचा-