(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs SA, Pitch Report : केरळच्या ग्रीनफिल्ड मैदानात रंगणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना, मैदानाची स्थिती, हेड टू हेड रेकॉर्ड, वाचा सविस्तर
IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी20 मालिकेला सुरुवात होणार असून केरळच्या तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे पहिला सामना खेळवला जाणार आहे.
India vs South Africa 1st T20 : भारतीय संघ (team india) दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध टी20 मालिका (India vs South Africa) खेळण्यासाठी मैदानात उतरत आहे. तीन सामन्यांटच्या टी20 मालिकेला केरळच्या तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये (Greenfield Stadium) उद्या अर्थात 28 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. दरम्यान पहिला सामना जिंकणारा संघ मालिकेत आघाडी घेणार असल्यामुळे दोन्ही संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असेल. त्यामुळे सामना होणाऱ्या मैदानाची स्थिती तसंच दोन्ही संघाचा एकमेंकाविरुद्धचा इतिहास जाणून घेऊ...
या मैदानावर मोठी धावसंख्या उभारल्याचं अजून दिसून आलेलं नाही. याठिकाणी पहिल्या डावात होणारी सरासरी धावसंख्या 118 आहे तर दुसऱ्या डावाची सरासरी धावसंख्या 117 आहे. विशेष म्हणजे ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आतापर्यंत फक्त दोन T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले आहेत. एका सामन्यात दोन्ही संघांनी 170+ खेळी केल्या असून दुसऱ्या सामन्यात मात्र पावसाचा व्यत्यय आल्याचं दिसून आलं आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका Head to Head
भारत आणि दक्षिण आफ्रिका(India vs South Africa T20 Record) यांच्यात आतापंर्यंत 20 टी-20 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 11 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, दक्षिण आफ्रिका संघाला 8 सामने जिंकता आले आहेत. यातील एक सामना अनिर्णित देखील ठरला आहे.
कसे आहेत दोन्ही संघ?
भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, शाहबाज अहमद.
दक्षिण आफ्रिकेचा संघ:
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, रिसोबा, रिसोबा रुसो, तबरीझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स.
हे देखील वाचा-