Ind vs Sa 2nd Test Day 2 Stumps : दुसरा दिवस दक्षिण आफ्रिकेच्या नावावर...; मुथुसामी अन् जानसेनने टीम इंडियाला रडवलं, कुलदीप अन् सिराजला धू-धू धुतले
Ind vs Sa 2nd Test Day 2 Live Scorecard Update Marathi : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर रंगला आहे.
LIVE

Background
India vs South Africa 2nd Test Day 2 Live Score Update : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर रंगला आहे. मालिकेतील हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. पहिल्या दिवशी दोन्ही बाजूंनी तगडी झुंज पाहायला मिळाली. पहिले दोन सत्रे दक्षिण आफ्रिकेच्या नावावर गेली, परंतु तिसऱ्या सत्रात टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत सामना पुन्हा रंगवला. त्यामुळे दुसरा दिवस प्रचंड रोमहर्षक ठरणार आहे.
पहिल्या दिवशी काय घडलं?
भारतीय संघ या मैदानावर पहिल्यांदाच कसोटी सामना खेळत आहे. पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी स्वीकारली. दिवस अखेर सहा गडी गमावून 247 धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्सने 49 धावा तर कर्णधार बावुमाने 41 धावांची उपयुक्त खेळी केली. सेनुरन मुथुसामी 25 आणि काइल वेरेने 1 धावांवर नाबाद आहेत. भारताकडून गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. कुलदीप यादवने 3 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेत आपली छाप पाडली.
Ind vs Sa 2nd Test Day 2 Live Score : दुसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस संपला!
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस संपला आहे. हा संपूर्ण दिवस दक्षिण आफ्रिकेच्या नावावर राहिला.
विशेषतः मुथुसामीने अप्रतिम खेळ करत भारतीय गोलंदाजांना चांगलंच हैराण केलं.
दक्षिण आफ्रिकेची पहिली खेळी 489 धावांवर संपल्यानंतर भारताने सावध सुरुवात केली.
स्टंप्सच्या वेळी भारताने पहिल्या डावात बिनबाद 9 धावा केल्या होत्या.
सध्या ते दक्षिण आफ्रिकेपेक्षा तब्बल 480 धावांनी पिछाडीवर आहेत.
यशस्वी जैस्वाल 7 आणि केएल राहुल 2 धावांवर नाबाद आहेत.
फिकट प्रकाशामुळे थोडासा अडथळा निर्माण झाला असला तरी दोन्ही सलामीवीरांनी संयमी खेळ करत कोणतीही विकेट न गमावता भारतीय डाव सावरला.
Ind vs Sa 2nd Test Day 2 Live Score : दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 400 धावांचा टप्पा गाठला
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 400 धावांचा टप्पा गाठला आहे.
त्यांच्या हातात अजूनही तीन विकेट शिल्लक आहेत.
सेनुरन मुथुसामी 86 धावांसह आणि मार्को जानसेन 48 धावांसह खेळत आहे.




















